Tuesday, February 5, 2013

गावविकासाचा उगम



 त्या दिवशी शाळा भरली तेव्हा प्रार्थनेला सगळे चुकार  िशक्षक हजर होते. हो ! शिक्षक, मुलं नव्हे! एरवी शाळा भरल्यावर दोन तासांनी उगवणा-या या महाभागांना चांगली जरब बसली होती. शांततामय मार्गाने महिलांनी ती बसवली होती. qहगोलीतल्या एका खेड्यात शाळेचा कारभार सुधारण्याचा हा चमत्कार बचतगटाने केलेला. केवळ आर्थिक सक्षमतेसाठीच बचतगट नसतात; तर त्यांनी गावाच्या उत्कर्षासाठी कारभारातही लक्ष घातलं पाहिजे हे जयाजी पाईकराव यांनी पक्कं रूजवलय. त्यांच्या ‘उगमङ्क या संस्थेचं काम पाहणाèयांना असे अनेक चमत्कार दिसतात. रखरखाट, पाण्याचा खडखडाट, खेडुतांचं मागासलेपण ही मराठवाड्याची वैशिष्ट्ये इथे गायब होतात. विज्ञाननिष्ठा बाळगून काम करण्यानं लोकांची स्थिती किती बदलू शकते हे कळतं.
नामांतर आंदोलनाच्या काळात झालेली जाळपोळ आणि नुकसान पाईकरावांनी जवळून पाहिलं होतं. ते सांगतात, ‘‘ दलितांच्या शोषणामागे आर्थिक मागासलेपण आहे आणि त्यावर विजय मिळविल्याशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणवलं. पत्रकारिता सोडून सामाजिक कार्याचे रितसर धडे गिरवायचं ठरवून मी १९७९ साली मुंबईच्या ‘टाटाङ्क  सामाजिक विज्ञान संस्थेत प्रवेश घेतला. या संस्थेत प्रवेश घेणारा मराठवाड्यातला मी पहिलाच!ङ्कङ्क अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पाईकरावांनी समाजकल्याण अधिकारी म्हणून नोकरी केली. पण मन रमलं नाही. राजीनामा देऊन पूर्णवेळ समाजकार्य सुरू केलं. युवक क्रांती दल, राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून नांदेडमध्ये त्यांची ओळख होतीच. १९८३ मध्ये ‘कयाधु ग्रामविकास संस्थेङ्क ची स्थापना करुन त्यांनी कंजारासह १५ गावांत रचनात्मक काम सुरु केलं. १९९० पर्यंत पाणलोट, ग्रामविकास यांवर भर होता. पाणीव्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. मुकुंद घारे, अणदूरचे डॉ. अहंकारी अशा तज्ज्ञांच्या सहकार्याने हे काम पुढे नेणं चाललं होतं. तीन गावात संस्थेच्या पाणलोट क्षेत्राच्या कामाल यश आलं. कळमनुरी तालुक्यातल्या जुंबडा गावात कायम पाणीटंचाई होती. त्यामुळं या गावात लोक आपली मुलगी देत नव्हते. पण पाणलोट क्षेत्रविकास झाल्याने आता याच गावातून चार गावांना पाणी पुरवलं जाऊ लागलं ! आर्थिक विषमता दूर व्हायची असेल, तर महिलाकेंद्रित उपक्रमांना पर्याय नाही, हे जाणून १९९६ साली ‘उगमङ्क ची स्थापन झाली. बचतगट चळवळीला नियोजनबद्ध रूप देणारे विजय कुलकर्णी आणि सुधा कोठारी यांनी जुंबडा गावात बचतगट स्थापण्यासाठी ‘उगमङ्क ला मदत केली. पुढे जमीन अधिकार आंदोलनात सहभागी होऊन ‘उगमङ्क ने गायरानधारक महिलांचे बचतगट गावोगावी तयार केले खरे, परंतु त्यांना पैसे द्यायला बँका कमी पडत होत्या. म्हणून जमीन अधिकार आंदोलनात एकत्र आलेल्या सामाजिक संस्थांनी अनिक फायनान्शियल सव्र्हिसेस प्रा. लि. ची स्थापनाा केली. तिने जिल्ह्यातल्या बचतगटांना २०१० मध्ये २१ लाख ९४ हजार रूपयांचं कर्जवाटप केलं. शेळीपालन, दुग्धविकास, बैलखरेदी, किराणा दुकान, बांगडी व्यवसाय अशासारख्या कामांसाठी ते होतं. दरम्यान पाईकराव यांनी जमिनीचा कस, पिकं यासाठी सेंद्रिय शेती कशी चांगली ठरते त्याची शिबिरं घ्यायला सुरूवात केली होती. लोकांना तिचं महत्व वाटू लागल्यावर दोन -तीन एकर जागेपैकी किमान दहा गुंठे जागेत सेंद्रिय शेती करण्याचं आवाहन केलं होतं. १९९६ मध्ये ‘उगमङ्क ची स्थापना झाल्यापासून हिंगोली जिल्ह्यात प्रथमच अशी शेती प्रत्याक्षात आली. व्यवहारात पैसा असेल, तरच पुरुष कामाला सरसावतात ही मानसिकता लक्षात घेऊन बचतगटांच्या महिलांनाच या शेतीचं प्रशिक्षण दिलं होतं.
 रासायनिक खतांना पर्याय म्हणून èहाझोबियम, गांडूळखत अशी जैविक खतं वापरली. एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं. सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या भाज्या, धान्यांना चांगला मोबदला मिळवून देण्याकरिता हमखास बाजारपेठही ‘उगमङ्क विकसित केली. qहगोलीच्या जिल्हा परिषदेसमोर दर शुक्रवारी असा वेगळा बाजार भरविण्यात येतो. औरंगाबादमध्ये प्रदर्शन भरवून चोखंदळ ग्राहकांपर्यंत हा माल पोचवण्यात आला. भाज्यांची मुळ चव राखली गेल्यामुळे, तुलनेत त्या जास्त टिकाऊ असल्याने ग्राहकवर्ग कायमचा बांधला गेला. या उत्पादनांना नेहमीपेक्षा १० टक्के भाव जास्त मिळतो. विक्री व्यवहारात दलाल-अडत्याला स्थान नाही त्यामुळे झालेला अख्खा न नफा शेतकèयांचाच. सातत्याने दहा वर्षे या प्रयोगाला यश मिळाल्यामुळे ५० गावांतले अडीच हजार अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक या शेतीत स्थिरावले आहेत. आजूबाजूच्या क्षेत्रातून शेतकèयांच्या आत्महत्यांच्या बातम्या येत असताना, या गावात तसं नाही हेही लक्षणीयच. कृषी तंत्रज्ञानाबाबत महिलांना डावललं जातं असं पाईकरावांना दिसून आलं. पुरूष शेतीचं केवळ ३० टक्के काम (पेरणी, वखरणी, नांगरणी) करतात पण त्यांना ७० टक्के तंत्रज्ञान मिळतं. सातबारा उताèयावर नावही पुरूषाचंच असतं. पण शेतात राबते महिला. शेतकी प्रशिक्षणात मात्र तिला मागे ठेवलं जातं. पुरुषांनी शिबिरात ऐकलेलं बाईपर्यंत पोचतच असं नाही. ‘उगमङ्क ने महिलांसाठी कृषीतंत्रज्ञान प्रशिक्षण सुरू केलं. त्यांना कृषी विद्यापीठात नेऊन कृषी अधिकाèयांशी भेट घडवून आणली. पेरणी अगोदरची बीजप्रक्रिया, मिश्रपिक घेण्याचे फायदे, दोन तासांमधलं (रोपांच्या ओळी) अंतर, काढणी पश्चात प्रक्रिया हे शिकवलं. २००९ पासून हा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत तीन हजार शेतकरी महिलांना याचा लाभ मिळाला आहे. सेंद्रिय पद्धतीनं मिळविलेल्या धान्याची डाळ जात्यावर केली, तर तिची चव टिकते हे हेरून संस्थेनं जात्याचा प्रचार केला. पण गृहणींची जात्याची सवय सुटलेली. यावर उपाय म्हणून बेअरिंग असलेलं जातं निर्माण केलं गेलं. हे सुटसुटीत जातं आता ग्रामीण भागात लोकप्रिय होत आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा स्वयंसेवी संस्थाच्या मदतीनं राबवावा असा वटहुकूम २००९ मध्ये सरकारनं काढला. प्रत्येक जिल्ह्याला त्यासाठी निधीही दिला. qहगोली जिल्ह्यात ‘उगमङ्क कडे ही जबाबदारी आली. तेव्हा पाईकराव आपल्या नियोजनबद्ध आराखड्यासह सरसावले. गावसुक्ष्म नियोजन हा ‘मग्रारोहयोङ्क मधला कळीचा घटक. त्यांनी सात ते अकरा गावांचा एक गट करून अभ्यास केला. प्रशिक्षण घेतलं आणि अहवाल सादर केले. त्याद्वारे ७०० गावातल्या मजुरांना कामं मिळाली. वटहुकूमाची तामिली करण्यासाठी सरकारी निधीचा विनियोग झाला. या कामाची इतकी प्रशंसा झाली की इतर गावांनी qहगोलीचा धडा गिरवावा असं वरून सांगण्यात आलं. बाकीच्या जिल्ह्यातला निधी तोपर्यंत अनेक वाटांनी गायब झालेला होता. त्यामुळं पुन्हा एकदा निधी वाटून ‘qहगोली पॅटर्नङ्क राबविण्याचा आदेश देण्यात आला. यावेळी qहगोलीलाही निधी मिळाल्यामुळं पाईकरावांनी काम आणखी परिणामकारक केलं. रोहयोचं काम ७०० वरून १४०० गावांत पोचलं.
जागतिक पातळीवर विविध १२ निकषांनुसार (दरडोई उत्पन्न, दुष्काळाची तीव्रता, साक्षरता, स्त्रीपुरुष लोकसंख्या, बालमृत्युदर वगैरे) मानवविकास निर्देशांक ठरतो. त्यानुसार देशातली मागास राज्यं, राज्यातले मागास जिल्हे शोधले जातात. महाराष्ट्र सरकारनं राज्यातील १२ जिल्हे मागास म्हणून निश्चित केले. त्यातही qहगोलीचा क्रमांक खालचाच होता. जिल्ह्यातल्या गावांमधल्या समस्या नेमक्या शोधून त्या मानवविकास मिशन (औरंगाबाद) पुढे मांडणं, त्यांच्या निर्मुलनासाठी प्रयत्न करणं ‘उगमङ्क नं सुरू केलं. qहगोलीत सेनगाव तालुका सर्वाधिक मागास. इथे स्त्रियांची संख्या दर हजारी ८२६. इथे सतत संपर्क ठेवून लोकसहभागातून उपक्रम केले. मागास भागांसाठीचा निधी मिशनकडून सेनगावकडं वळवळा आणि गर्भqलगनिदान रोखणं, जलस्त्रोत बळकटीकरण आदी कामं घडवून आणली.
‘उगमङ्कचे कार्यकर्ते पाच दिवस गावात जाऊन राहतात आणि तिथली परिस्थिती अभ्यासतात. त्यांच्यातलचं एक होऊन राहायचं असल्यानं ते आपल्यासोबत काहीही नेत नाहीत. नेसत्या वस्त्रानिशी जातात. लोकांना भेटतात. समस्या अनुभवतात. त्या मानवविकासला सादर करतात. मिशनकडून गावसुधारणा साधून घेण्यास संपूर्ण गावाला सामावून घेतात. तारेगावमधली सहा महिने बंद असलेली अंगणवाडी सुरू होते. बंद झालेलं खाऊ देणं सुरळीत होतं. ग्रामसेवकाची वागणूक सुधारते. शिक्षकांची मनमानी बंद होते. संडासला जागा नसलेल्या  गावात शोषखड्डयांचा उपाय काढला जातो. किशोरींच्या रक्तचाचण्या घेऊन हिमोग्लोबिन पातळी सुधारण्यासाठी गोळ्या दिल्या जातात. गावागावानुसार समस्या बदलतात.
शासकीय योजना आणि त्यावर आधारित कामांवर संस्थेचा भर असल्यामुळं जिल्हास्तरीय प्रशासकीय यंत्रणेशी संस्थेचा चांगला समन्वय आहे. योजनांच्या अंमलबजावणीसाठी याचा फायदाही होतो. मात्र अन्याय, अत्याचाराविरोधात, न्याय हक्कांसाठी, स्थानिक प्रशासनाच्या, सरकारच्या विरोधात आंदोलन करताना संस्थेचे प्रशासकीय संबंध कधी कधी अडचणीचे ठरतात. ‘उगमङ्क जरी महिलाकेंद्रित कामातून झाला असला तरी संस्थेचं कमा नदीच्या प्रवाहाप्रमाणे वळणावळणाने मार्गक्रमण करत वाटेवरच्या गावांना विकासाच्या दिशेनं घेऊन चाललं आहे.

               ---- शिवाजी कांबळे
                shivaji.kamble5@gmail.com

No comments:

Post a Comment

Translate