Sunday, December 30, 2012

समतावादी कवी : केशवसुत


 आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे कविवर्य केशवसुत -कृष्णाजी केशव दामले यांचा आज (७ ऑक्टोबर) जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या काव्यजगताचे स्मरण करून देणारा हा लेख...

प्रसारमाध्यमांतून सामाजिक प्रश्नांची अ‍ॅडव्होकसी करणा-या ‘संपर्क टीमच्या कार्यशाळेनिमित्त २००९ च्या ऑगस्ट महिन्यात गणपतीपुळ्याला गेलो होतो. तेथून जवळच असलेल्या मालगुंड येथील केशवसुत स्मारकाला भेट देण्याचा अपूर्व योग आला. शालेय जीवनात केशवसुतांच्या ‘तुतारीङ्क, ‘झपूर्झाङ्क, ‘नवा शिपाईङ्क  यांसारख्या कविता पाठ केल्या, अभ्यासल्या.  त्या कवीच्या जन्मगावी जाऊन त्यांचे स्मारक पाहण्याचा योग हा अविस्मरणीयच. कविवर्य कुसुमाग्रजांनी या स्मारकाला ‘मराठी कवितेची राजधानीङ्क संबोधून गौरव केलेला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथील केशवसुत-कृष्णाजी केशव दामले यांचे हे अत्यंत देखणे स्मारक महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशा थाटात उभे आहे.  केशवसुतांचे शेणा-मातीचे राहते घर, अभ्यासाची खोली, दुर्मिळ वस्तू आजही या स्मारकात जशाच्या तशा पाहावयास मिळतात. केशवसुतांच्या काही उल्लेखनीय कविता स्मारक परिसरात मैलाचा दगड असलेल्या आकारातील फलकावर कोरण्यात आलेल्या आहेत. शिवाय या ठिकाणी सुसज्ज असे गं्रथालय आहे. १९९० साली रत्नागिरीत झालेल्या ६४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी या स्मारकाला मूर्तरूप दिले. या स्मारकाचे उद्घाटन कविवर्य कुसुमाग्रजांच्या हस्ते १९९४ मध्ये करण्यात आले. या स्मारकाच्या एका खास दालनात केशवसुतोत्तर काळातील महत्त्वाच्या कवींच्या कवितांचा समावेश आहे. केशवसुतांनंतरच्या काळापासून १९५० पर्यंत जन्मलेल्या व ज्यांनी आधुनिक मराठी कविता समृद्ध केली अशा ६६ निवडक कवींच्या कवितांचा यात समावेश आहे. हे दालन ‘आधुनिक मराठी काव्यसंपदाङ्कदालन म्हणून ओळखले जाते. हे दालन गं्रथरूपानेही काव्यरसिकांसाठी प्रकाशित करण्यात आलेले आहे. या दालनाचे उद्घाटन कविवर्य वसंत बापट यांच्या हस्ते झाले होते.  हे स्मारक सातत्याने नव्या वाटा चोखाळणाèया नवकवींना प्रेरणादायी असून प्रवर्तन साहित्याला दिशा देणारे आहे.
  केशवसुतांच्या मरणोपरांत शंभर वर्षांनंतर मराठी कवितेत आजही केशवसुत परंपरा दिसून येते. प्रस्थापित काव्यपरंपरेला छेद देण्याचे काम आपल्या काव्यातून केलेले आहे. मानवतावाद, समता, विश्वबंधुत्व, रूढीभंजन, स्वातंत्र्यप्रेम, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार, विषमता, सामाजिक दु:ख, अन्याय, अंधश्रद्धा हे विषय त्यांच्या कवितेतून आले. केशवसुतांनी मराठी कवितेला वास्तवतेचे भान दिले. म्हणूनच त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांच्यासारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीतङ्क नावाने त्यांनी मराठीत रूढ केला. त्यांच्या एकूण १३५ च कविता उपलब्ध आहेत. त्यांच्या कविता संख्येने कमी असल्या तरी क्रांतिकारक आणि प्रवर्तक ठरल्या आहेत. ‘तुतारीङ्क, ‘झपूर्झाङ्क, ‘नवा शिपाईङ्क,  ‘हरपले श्रेयङ्क, ‘मूर्तिभंजनङ्क, ‘आम्ही कोणङ्क,  ‘गोफणङ्क, या त्यांच्या काही उल्लेखनीय कविता. त्यातील ‘तुतारी ङ्कही कविता क्रांतिकारक ठरली.
एक तुतारी द्या मज आणुनि,
फुंकिन जी मी स्वप्राणाने,
भेदुनि टाकिन सगळीं गगनें
अशी तुतारी द्या मजलागुनि
 ही कविता खèया अर्थाने आधुनिक मराठी कवितेची तुतारी ठरली. या कवितेच्या नावावरून तेव्हा  तुतारी मंडळ स्थापन झाले होते. तर त्यांच्या  ‘कविता आणि कवीङ्क, या कवितून कवीच्या प्रतिभेला कोणी आदेश देऊ नये, असे खणकावून सांगितले.
अशी असावी कविता, फिरूनी
तशी नसावी कविता, म्हणून
सांगावया कोण तुम्ही कविला
अहांत मोठे ? पुसतों तुम्हाला
 या कवितेतून जनतेसाठी कविता असते असे म्हणण्यापेक्षा ती कवीसाठी असते, यावर केशवसुतांनी भर दिलेला दिसून येतो. कवितांतून मिळणारा आनंद हेच एकमेव कवीचे उत्तम पारितोषिक मानले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. कवीची प्रतिभा ही एक स्वतंत्र चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही कसलेही आदेश देऊ नयेत, असे त्यांनी या काव्यातून सांगितले आहे. केशवसुतांच्या मृत्यूनंतर बारा वर्षांनी त्यांची कविता ‘ज्ञानप्रकाशङ्क या पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आली. कादंबरीकार ह. ना. आपटे यांच्यामुळेच. मात्र केशवसुतांच्या हयातीत त्यांची आणि त्यांच्या कवितेची उपेक्षाच झाली. त्यावेळी कोणीही त्यांच्या कवितेबद्दल गौरवोद्गार काढले नाहीत. म्हणून महाराष्ट्राच्या वाचकांमध्ये गुणग्राहकता नसल्याची त्यांना खंत होती. आपली कविता कुठेच छापून येत नाही, याचे त्यांना वाईट वाटत होते. म्हणूनच त्यांनी एका कवितेत म्हटले आहे, ‘भिकार या जगी, इच्छित न मिळे काही, म्हणून तुझेपायी, भिक्षांदेहीङ्क
पण त्यांच्या मृत्युनंतर अख्ख्या महाराष्ट्राने त्यांच्या कवितांना डोक्यावर घेतले. आधुनिक मराठी कवितेचा जनक म्हणून गौरव केला. केशवसुतांच्या कवितांमध्ये वास्तवाचे भान आहे. आधुनिक दृष्टी, संवेदनशीलता, नवा आशय, सामाजिकता आजच्या घडीची वाटतात. म्हणूनच केशवसुतांच्या  कवितेपासून आधुनिक मराठी कवितेचा प्रारंभ झाला असे म्हणतात. काही तथाकथित बुद्धिजीवी मंडळी काव्य वा साहित्याला पाल्हाळ म्हणून टीका करतात. साहित्यातून समाजपरिवर्तन वा क्रांती होऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे. परंतु साहित्यिकच सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रोन्नतीला हातभार लावू शकतात, ही जाणीवच माणसांना कृतिशील बनवते आणि त्यातूनच क्रांती आकार घेत असते. कवीसुद्धा एक विचारवंतच असतो. केशवसुत आपल्या ‘मूर्तिभंजनङ्क कवितेतून समाजातील विकृतीवर प्रहार करतानाही मागेपुढे पाहात नाहीत.
 मूर्ति फोडा, धावा! धावा, फोडा मूर्ति!
 आंतील सम्पति फस्त करा!
 व्यर्थ पूजाद्रव्यें त्यांस वाहूनीयां,
 नाकें घासूनीयां काय लभ्य?
अध्यात्मात अडकून पडलेल्या मराठी कवितेला त्यांनी पहिल्यांदा सर्वसामान्य माणसांच्या जगात आणले. आपल्या काव्यातून त्यांनी रूढी, परंपरेच्या शृंखला तोडल्या. तर  प्रेम आणि मायेचे तत्त्वज्ञानही त्यांनी फार सुंदररीतीने आपल्या कवितांमधून मांडलेले आहे. आईची आठवण काढताना ते आपल्या ‘आईकरिता शोकङ्क या कवितेतून म्हणतात..
 ‘अन्तरले पाय तुझे हाय हाय माते
मागें तव दर्शन मजलागुनीं जहाले
 तदनन्तर लोटुनिया दिवस फार गेले,
फिरुनी तुझ्या चरणांतें उत्सुक मी बघण्यातें
असता अन्तींहि न तेङ्क
अशा आशयगर्भ कवितांमधून त्यांनी नव्या वाटा निर्माण केल्या. केशवसुत त्याकाळच्या काव्यजगताचे युगप्रवर्तक ठरले.  कवितेलाच जीवनसर्वस्व मानणाèया या कवीला वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूने गाठले आणि एका काव्यसूर्याचा अस्त झाला. केशवसुतांच्या जन्मदिनी त्यांचे स्मरण करताना महाराष्ट्रातील कवी आणि काव्यरसिकांनीही अंतर्मुख होऊन कवितेकडे पाहण्याची गरज आहे.
             
                                                   -शिवाजी कांबळे, लातूर
                                                          ९०४९२ ९८७५०
                                             

No comments:

Post a Comment

Translate