Monday, January 21, 2013

काकदृष्टीचे असहिष्णु कांबळे


काकदृष्टीचे असहिष्णु कांबळे
दैनिक ‘एकमतच्या दि. २५-१२-२०१२ च्या अंकातील वाचककट्ट्यामध्ये शिवाजी कांबळे यांचे ‘अस्पृश्यता पाळणारी श्यामची आई या मथळ्याचे प्रसिद्ध झालेले पत्र वाचले. त्यांच्या पत्राचे शवविच्छेदन करावे व त्यांच्या कुविचारांची नांगी वेळीच ठेचावी हा या लेखनामागचा हेतू. कोणत्याही घटनेचा व प्रसंगाचा विचार
माणसाने कालसापेक्षच केला पाहिजे नसता काल-विपर्यासामुळे चुकीचा निष्कर्ष निघतो. ऐतिहासिक घटनांचा विचार कालसापेक्षच करावा म्हणजे कोणावर अन्याय होत नाही. तत्कालीन मूल्यांतूनच गतकालीन घटनांचे मूल्यमापन करावे. विद्यमान मूल्यांतून गतकालीन घटनांचे मूल्यमापन करण्याची घोडचूक शिवाजीराव कांबळे करीत आहेत. रछत्रपती शिवाजी महाराजांना भवानीमाता प्रसन्न होती. प्रसन्न होऊन देवीने दिले काय तर भवानी तलवारच! का देऊ नये तिने अ‍ॅटमबॉम्ब, नायट्रोजन बॉम्ब वा एखादे लांब पल्ल्याचे मिसाईल? शिवाजी महाराजांनी अफझलखानचे हृदयपरिवर्तन न करता त्याला ठारच केले व औरंगजेबाच्या दरबारात सत्याग्रहाचा मार्गाचा अवलंब न करता,‘शक्तीने मिळती राज्ये युक्तीने कार्य होतसे,ङ्क हाच मार्ग चोखाळला. ज्या ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवण्याचा व निर्जीव qभत चालवण्याचा चमत्कार केला. चमत्कार सोडून द्या पण वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिण्याचा व एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेण्याचा महान योग साधला. त्या योगीयाच्या राजाला निवृत्ती सोपान मुक्ताबाई या भावंडांना घेऊन पैठणच्या कर्मठ व सनातनी ब्राह्मणांकडे पायपीट करीत जाऊन प्रमाणपत्र आणण्याची काय आवश्यकता होती, त्या काळात ती होती हेच आजच्या या प्रश्नाचे एकमेव उत्तर आहे.काळाची गती, विज्ञानाची प्रगती, औद्योगिकीकरण या विक्रीकरण यांचा रेटा जबरदस्त असतो. त्यात शिक्षणाची भर पडली की परिवर्तनाला लक्षणीय गती येते. १९५० साली मी
सातवीला होतो. आमच्या घरी वडिलांची आत्या होती. फारच कर्मठ व सनातनी तिचे सोवळे ओवळे फारच जाचक. तिच्या तुलनेत माझी आई फारच उदारमतवादी. माझे सहकारी सर्वश्री साबणे, कांबळे, वाघमारे, ताटे, आदोडे, उजगरे, लोंढे, क्षीरसागर माझ्या घरी निमित्ताने जेवावयास येत. ते सर्व माझ्या पाटाला पाट व ताटाला ताट लावून जेवत.माझी आईच पंक्तिप्रपंच न करता मायेने वाढीत असे. मी ज्या काळात सातवीला होतो त्या साली पु.साने गुरुजींनी निराश, उदास होऊन उद्विग्नतेने झोपेच्या गोळ्या गिळून जीवनयात्रा संपविली.त्यांची आई त्यांच्या बालपणी, कोकणातल्या पालगड गावी, समाजावर
सनातनी व कर्मठांच्या कर्मकांडाचे वर्चस्व व प्रस्थ होते. त्या काळात प्रथेप्रमाणे अस्पृश्यता पाळत होती. तरी तिचे अंतःकरण करुणेनेव भूतदयेने भरून ओसंडत होते. हे न लक्षात घेता तिच्यावर दोषारोप करून आक्षेप घेणे
कमालीच्या असहिष्णू वृत्तीचे व निष्ठूरपणाचे निदर्शक आहे. अशा माणसाला मी एकारलेल्या विचाराचे संबोधतो. अशा माणसाला काकदृष्टी व गिधाडाचीच चोंच असते.
                                    -राजेश्वर शिवाजी देशमुख
                                पेठ परळी वैजनाथ, जि. बीड.

No comments:

Post a Comment

Translate