Tuesday, February 5, 2013

व्यक्ती नव्हे संस्था !



 आदिवासीबहुल जिल्ह्यात रुग्णालय
 बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय उपक्रम
 युवक, किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षण
 ‘डॉक्टर होऊन समासेवा करायचीय...ङ्क बोर्डात  येणाèया विद्याथ्र्यांच्या मुलाखतीत हमखास ऐकू येणारं वाक्य. पुढे त्याच्याशी कितीजण निष्ठा राखतात हा प्रश्नच. आयुष्याकडून खरोखरच अशी अपेक्षा असणा-यांनी मात्र कॉलेजवयातले संस्कार कसे फुलवावेत याचा धडा डॉ. अशोक बेलखोडे यांच्याकडून घ्यावा. १९८० च्या दशकात ‘भारत जोडोङ्क उपक्रमात बाबा आमटे यांच्या कार्यानं प्रभावित सहभागी युवकांमध्ये तेही होते. नागपूरमध्ये वाढलेल्या तरुणाला डॉक्टर झाल्यानंतर तिथं प्रॅक्टीस करुन पैसे कमावत आरामात राहता आलं असतं. पण त्यात समाधान न मानता त्यांनी आदिवासीबहुल किनवटमध्ये आयुष्य वेचण्याचा निर्णय घेतला.
नांदेड जिल्ह्यातला किनवट तालुका राज्याच्या सीमावर्ती दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात मोडतो. याच कारणानं विकासापासून वंचित. आता आताशा विकासाची पावलं उमटायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याचं ठिकाण नांदेड ते किनवट हे अंतर १५० किमी. पण ते पार करण्यासाठी एसटीबसला तब्बल पाच तास लागतात. याच गतीनं विकास चालला आहे. किनवट प्रशासकीयदृष्ट्या मराठवाड्यात, पलीकडे विदर्भातील यवतमाळची हद्द, तर अवघ्या ५० किमीवर आंध्रप्रदेशातील अदिलाबाद, कापसाची मोठी बाजारपेठ, किनवटच्या उपजाऊ शेतीत कपाशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन असूनही प्रक्रिया उद्योग आणि शेतीपूरक जोडधंदे निर्माण करण्याबाबत सरकार उदासीन. त्याची बीजं सत्ताकारणात. स्थानिक नेतृत्व आदिवासी बंजारा. त्यांना डावलण्याकडे सत्ताधाèयांचा कल.
 किनवटच्या सुमारे सव्वा लाख लोकसंख्येत ४० टक्के आदिवासी आणि ३० टक्के बंजारा समाज. आदिवासींमध्ये प्रामुख्याने गोंड, कोलाम, आंधा, परधान, नाईक यांचा समावेश. २५ टक्के दलित, मुस्लिम, कोमटी समाज. उच्चवर्णीय नाममात्र. येथील व्यवसायीक आणि आर्थिक क्षेत्रावर कोमटी समाजाचं प्राबल्य. इथला आमदार आदिवासी qकवा बंजारा समाजाचाच असतो. डी.बी. पाटील यांच्यासारखा मराठा समाजाचा आमदार अपवादात्मक. यामुळे शासन या भागाकडे नि:पक्षपातीपणे पाहत नाही. असा स्थानिक कार्यकत्र्यांचा आरोप आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या विकासनिधीची फळं सामान्यांना दिसत नाहीत.
प्रशासकीय यंत्रणेत सुसूत्रता नसण्याचेही दुष्परिणाम आहेत. तालुक्याच्या वनविभागीय कारभारावर अकोल्याचं तर प्रशासकीय कारभारावर नांदेडचं नियंत्रण आहे. वनविभागाचा आडमुठेपणाही काही कमी नाही. एकूण जनता अडाणी राहावी यासाठी पोषक वातावरणाची जोपासना झाली आहे. तालुक्यातल्या ४० गावांत वाहतूकीसेवा आजही नाही आणि पावसाळ्यात १० गावांचा संपर्क जगापासून तुटलेला. कोणत्याही आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांनी नाहक प्राण गमवावे लागत. तातडीच्या व गंभीर उपचारासाठी या भागातील लोकांना नांदेडला जाण्याशिवाय पर्याय नसे.
औरंगाबादच्या सरकारी मेडिकल कॉलेजमधून एमएस झाल्यावर १९८९ मध्ये डॉ. अशोक बेलखोडे किनवट इथं ठरवून दाखल झाले तेव्हा अशी स्थिती होती. तालुक्यात एकही सर्जन नव्हता. बालपण कोतेवाडा ता. qहगणा या खेड्यात गरिबीत गेलेलं असल्यामुळे त्यांना गरिबांच्या गरजा नेमक्या ठावूक होत्या. पण किनवटमध्ये वेद्दकीय सेवा देण्याचे  त्याआधीचे इतरांचे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते, हा अनुभव पाहता अर्थार्जनाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. हे ही त्यांना उमगलं होतं. अरोग्य अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारली ती त्यासाठीच. ते काम सुरु असतानाच किनवटमध्ये सुसज्ज रुग्णालय उभारायचा विचार करत होते.
‘हॅलो मेडिकल फाउंडेशनङ्क, ‘मातृमंदिरङ्क बरोबर त्यांनी काम केलेलं होतं. तिथं झालेल्या ओळखीतून अनेकांनी आर्थिक मदत देऊ केली. एका कंपनीनं ऑपरेशन थिएटरचं साहित्य तर डॉ. बोरगावकर यांनी ऑपरेशनची उपकरणं दिली. एका कंपनीनं एक्स रे मशीन दिलं. भंगाराच्या सामानातून पलंग तयार झाले. ३ मार्च १९९५ मध्ये अशा प्रकारे २० खाटांचं साने गुरुजी रुग्णालय ना नफा तत्वावर सुरु झालं. किनवट आणि माहूर तालुक्यातल्या ३९२ खेड्यांतल्या लोकांसाठी ती जीवनरक्षक सेवाच झाली. नांदेड जिल्ह्यातील इतर डॉक्टरांच्या शुल्काच्या ३० ते ५० टक्के कमी शुल्कात इथे तपासणी करुन औषधोपचार दिले जातात. २०१० पर्यंत या रुग्णालयात ३५ हजारांच्यावर कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया, एक हजार हायड्रोसिल शस्त्रक्रिया, सव्वा लाखांवर रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. रुग्णालयातील प्रसुतीला प्रोत्साहन देण्यासाठी इथे प्रसूत होणाèया मातांचा चोळी- बांगडी देऊन सन्मान केला जातो. गावा-पाड्यात शिबिरं आयोजित करुन सानेगुरुजी रुग्णालयाची सेवा वेळोवेळी लोकांपर्यंत पोहचविण्यात आली. वर्षाला ४४० हून अधिक गंभीर रुग्णांवर उपचार असे सरासरी प्रमाण. टँकर अपघातात मृत ठरवल्या गेलेल्या एका महिलेला डॉक्टरांनी योग्य उपचारांनी बरं केल्याची आणि बोअरिंगच्या खोल खड्डयात पडलेल्या मुलाचा जीव वाचविल्याची घटना इथे तात्काळ सेवेचं उदाहरण म्हणून सांगितले जाते. एकखांबी काम असूनही या आडपेठच्या गावात केवळ लोकसहभागातून रक्तपेढी उभारण्यात ते यशस्वी झाले. त्यांनी आधी उपचार आणि नंतर आरोग्यशिक्षण असा कार्यक्रमा ठेवला. सानेगुरुजी रुग्णालया हे ‘भारत जोडो युवा अकादमीङ्क सामाजिक कार्यातूनच उभं राहीलेलं असल्यामुळे समाजप्रबोधन आणि सेवा हातात हात घालून चाललं आहे.
कॉलेज युवक मोठ्या शहरात गेले की मौजमजा करतात हे त्यांच्या गुप्तरोगाचं कारण लक्षात आलं तेव्हा डॉ. बेलखोडेंना समुपदेशनाची गरज तीव्रतेने जाणवली. वैयक्तिक समुपदेशनाच्या तुलनेत लैंगिक शिक्षण देणारी व्याख्यानं प्रभावी परिणाम साधतील हा त्यांचा होरा खरा ठरला. शाळा-कॉलेजात अशा व्याख्यानांना विद्याथ्र्यांच्या मोठा प्रतिसाद मिळतो. वैज्ञानिक विचारांची बैठक तयार होणं ही आमची गरज आहे आणि तुमच्या उपक्रमातून ती पूर्ण होतेय, असं विद्यार्थी आवर्जून सांगतात. सामाजिक काम  या दिशेनं पुढे नेण्यासाठी डॉ. बेलखोडेंनी मराठी विज्ञान परिषदचे उपक्रम किनवटमध्ये सुरु केले. अभ्यासक्रमाशी संबंधित प्रयोग मुलांना कार्यशाळेत करु दिल्यामुळे मुलांना, शोधांची, संशोधकांची महती सांगणारी व्याख्यानं आयोजित केल्यामुळे मुलांना शाळेतला अभ्यासक्रम परका वाटेनासा झाला.  आठवी, नववीच्या  मुलींसाठी लैंगिक शिक्षण देणाèया स्लाइड शो व्यतिरिक्त एड्सबाबत माहिती देणारे कार्यक्रमही आयोजित केले जातात. सर्पविज्ञान समजावणं, मुलांसह उल्कावर्षाव पाहणं यातून त्यांना निसर्गवाचनात साक्षर केलं. यातूनच पुढे तालुका विज्ञान-तंत्रज्ञान केंद्र आकाराला आलं. शिवाय महिला सक्षमीकरणाचा मुद्दा संस्थेनं महत्त्वाचा मानला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाèया महिलांना संस्थेतर्फे झेप पुरस्कार महिलांना मार्गदर्शन केलं जातं. बचतगट संस्थांनाही मार्गदर्शन केलं जातं. त्यांच्यासाठी आरोग्य आणि कायदेविषयक शिबिरांचं आयोजन केलं जातं. प्रौढ साक्षरता, रक्तदान प्रसार, बालकामगारांसाठीच्या रात्रशाळा चालविल्या जातात. गरीब मुलांसाठी साने गुरुजी इंग्लिश माध्यमाची शाळा सुरु केलेली आहे. नैसर्गिक आपत्तीत मदतकार्य करण्यासाठी प्रथमोपचाराचे धडे घेतलेला युवकांचा गट तयार केलेला आहे. किल्लारीचा भूकंप, गुजरातमधली पूरपरिस्थिती आदी प्रसंगी हा गट मदतीसाठी धावून गेला होता. आरोग्य सुविधा इथेच मिळत असल्याने लोक मोठ्या शहराकडे आताशा जात नाहीत. असं असलं तरी खेड्यांकडं वळणारा  इतर दुसरा डॉक्टर इथे एवढ्या वर्षात दिसलेला नाही, याला काय म्हणायचं?        

                               ---- शिवाजी कांबळे
                           shivaji.kamble5@gmail.com

No comments:

Post a Comment

Translate