परिचय




शिवाजी लक्ष्मण कांबळे





जन्मजुलै १२, इ.स. १९७१
राष्ट्रीयत्वभारतीय
नागरिकत्वभारतीय
शिक्षणमानववंशशास्त्रात पदवी
पेशापत्रकारिता
मूळ गावभोगाव (धानोरा) ता. वसमत जि. हींगोली
पदवी हुद्दामुख्य उपसंपादक
अपत्ये

अनार्य आणि कादंबरी
वडीललक्ष्मणराव
आईसुशिलाबाई
पुरस्कार
उत्कृष्ट वार्तालेख (सा. महाराष्ट्र, औरंगाबाद),उत्कृष्ट पत्रकारीता(शिक्षक भारती, नांदेड),काव्यश्री ( फे्रंड सर्कल, पुणे)
जिल्हा युवा पुरस्कार (नेहरु युवा केंद्र, उस्मानाबाद)
संकेतस्थळ
http://shivajikamble.blogspot.in/
शिवाजी लक्ष्मण कांबळे (जुलै १२, इ.स. १९७१ -हयात) हे दैनिक एकमत (लातूर) वृत्तपत्राचे मुख्य उपसंपादक,
 पत्रकार, स्तंभलेखक आणि पुरोगामी सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत

थोडक्यात परिचय

हिगोली जिल्ह्यातील मुळ गाव भोगाव ( धानोरा ) येथे दलित कुटुंबात जन्म. छात्रभारती, राष्ट्र सेवा दल या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य. प्रसार माध्यमांतून सामाजिक विषयांची मांडणी {अ‍ॅडव्होकसी} करुन सरकारचे लक्ष वेधण्याचे ‘संपर्क, मीडिया नेटवर्क नामक संस्थेच्या माध्यमातून कार्य. विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्यिक विषयावर विपुल स्फुटलेखन.

शिक्षण

प्राथमिक शिक्षण भोगाव (धानोरा) जि. हिगोली येथे, तर माध्यमिक शिक्षण उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथे झाले. मानववंशशास्त्रात पदवी घेतली. प्रतिकुल आर्थिक परिस्थिती असल्याने,ऑईल मिलमध्ये कामगार, इमारत बांधकामावर काम केले. शिवाय अन्य मजुरीची कामे करीत शिक्षण घेतले.

कारकीर्द

शिक्षण सुरु असताना आणि त्यानंतर छात्रभारती, राष्ट्र सेवा दल या सामाजिक संघटनामध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून बरीच वर्षे सामाजिक कार्य केले. नळदुर्ग येथील अनाथ मुलांच्या आपलं घर प्रकल्पात वर्षभर कार्य केले. १९९२ मध्ये उस्मानाबादच्या दै. संघर्षमधून पत्रकारितेला प्रारंभ केला.दरम्यानच्या काळात दै. लोकमतमध्ये ग्रामीण वार्ताहर, उपसंपादक म्हणून पाच वर्षे काम केले. २००४ मध्ये नांदेडला दै. पुण्यनगरीचे उपसंपादक म्हणून रुजू झाले. दरम्यानच्या काळात 'संपर्क मीडिया नेटवर्कचे' जिल्हाप्रतिनिधी म्हणून दोन वर्षे काम केले. २ जुलै इ.स. २०१२ पासून लातूरच्या दैनिक एकमतमध्ये मुख्य उपसंपादक म्हणून काम पाहत आहेत.

पत्रकारिता

बातमीदार, दैनिक लोकमत, येरमाळा (१९९२-९४), उपसंपादक, दैनिक लोकमत, उस्मानाबाद (१९९४-९८). प्रासंगिक कलावंत, आकाशवाणी उस्मानाबाद केंद्र (१९९६). जिल्हा प्रतिनिधी, सा. महाराष्ट्र, काल-आज-उद्या, उस्मानाबाद (२००१-०२). उपसंपादक, दैनिक पुण्यनगरी, नांदेड (जाने.२००४-०८). जिल्हा प्रतिनिधी, दैनिक सुराज्य सोलापूर, नांदेड (२००९-१०). मुख्य उपसंपादक, दै. देशोन्नती, अकोला (२०११). मुख्य उपसंपादक, दैनिक एकमत, लातूर (जून-२०१२ पासून)

No comments:

Post a Comment

Translate