Thursday, December 26, 2013

शेतक-याचं चांगभलं

महाराष्ट्रातल्या शेतक-यांचं चांगलं झालं पाहिजे, या दृष्टीने राज्य सरकारच्या वतीने काही चांगले निर्णय घ्यायला सुरुवात झाली आहे. शेतक-यांच्या मालाच्या विक्रीसाठी करण्यात आलेला कृषि उत्त्पन्न बाजार समिती कायदा रद्द करून, सरकारने शेतक-यांना आपला शेतीमाल पाहिजे त्या ठिकाणी विक्री करण्याची मुभा असेल, असे नुकतेच जाहीर केले आहे. तसेच त्यानंतरचा निर्णय म्हणजे कृषिमूल्य आयोगाची स्थापना हा होय. राज्य सरकारने घेतलेल्या या दोन्ही निर्णयामुळे
शेतक-यांना काही प्रमाणात का असेना पण दिलासा मिळणार आहे. कृषिमूल्य आयोग हा शेतक-यांच्या शेतीमालाच्या उत्पादनाला
किती खर्च येतो याचा हिशेब करून सरकारला त्याची आकडेवारी सादर करील. सद्यःस्थितीत शेतकèयांना मजूर मिळत नाहीत, मिळाले तरी २५० रुपये प्रमाणे मजुरी द्यावी लागते. पण कृषिमूल्य आयोग एका व्यक्तीची मजुरी केवळ ८० रुपयेच हिशेबात धरते. मागील पंधरा वर्षांपूर्वी हा हिशेब केला होता.
त्याप्रमाणेच आजही तोच हिशेब धरला जातो आहे. ही बाब म्हणजे देशाच्या नियोजन आयोगाकडून गरिबीची जशी हास्यास्पद व्याख्या केली गेली तसेच आहे. शेतक-यांची चेष्टा करण्याचाच हा भाग आहे.  केंद्र सरकार कृषिमूल्य आयोगाची
स्थापना करत असते; पण हा आयोगच कृषिमूल्य ठरविणे योग्य नाही, त्यामुळे शेतक-
यांचे नुकसान होईल, असे अकलेचे तारे तोडतो. राज्य सरकारने आता कृषिमूल्य आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. या आयोगाकडून शेतक-यांच्या हिताचे
 काम व्हावे तरच या आयोगाला महत्त्व आहे. या आयोगामार्फत प्रभावीपणे शेतकरीहिताचे काम व्हावे यासाठी शेती अर्थव्यवस्थेबद्दल आस्था असणारे, शेती व्यवसायाचा अनुभव
असलेले कृषितज्ज्ञ लोक नेमले जावेत. जेणेकरून शेतीमालाला चांगला भाव
मिळेल, शेतक-यांची चेष्टा होणार नाही. अन्यथा हा आयोग निवळ कर्मकांड ठरेल आणि आयोगावरील अधिका-यांच्या खर्चापोटी लाखो रुपये पाण्यात
जातील. शेतक-यांची स्थिती तर अत्यंत वाईट अशी आहे. शेतकरी आपला शेतीमाल
शेतातून थेट बाजारपेठेत आणतात आणि जास्तीचा माल आल्याचे कारण पुढे करून व्यापारी तो माल बेभाव विकत घेतात. त्यानंतर भाव वाढले की व्यापारी तोच माल चढ्या भावाने विकतात आणि भरमसाठ नफा कमवतात. कांदा दराच्या बाबतीत तेच घडले.त्यामुळे कांद्याचे दर सरकन् खाली उतरले आणि शेतक-यांच्या मुळावर आले. ऊस, कापूस असो की इतर कोणतेही शेतीपीक असो, सगळ्या पिकांच्या भावाबाबत जवळपास हेच घडत असते. त्यामुळे चहूबाजूंनी शेतक-यांची कोंडी होते. सरकार आणि व्यापा-यांकडून शेतक-यांचे एकप्रकारे शोषणच केले जात आहे. ‘शेतक-याने नाही केला पेरा तर जग काय खाईल धतुराङ्क, असे शेतकरी संघटनेने कोकलून सांगितले तरी शेती आणि शेतक-यांकडे अजूनही फारसे कोणी लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक सरकारांनी शेतक-यांच्या हिताची धोरणे जाहीर केली, पॅकेज जाहीर करण्यात आले, आश्वासने देण्यात आली; परंतु प्रत्यक्षात शेतक-यांच्या पदरात काहीच पडले नाही. ‘कशात काय आणि फाटक्यात पायङ्क अशी गत शेतक-यांची झाली आहे. या सगळ्या अन्यायातून शेतक-यांची सुटका व्हावी यासाठी प्रभावी कृषिमूल्य आयोगाची आवश्यकता आहे. निवळ घोषणा नको तर आता कृतीची गरज आहे. या आयोगाने प्रामाणिकपणे काम करून शेतीमालाची qकमत ठरविली पाहिजे. तसेच सरकारने ठरविलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीला शेतीमालाची खरेदी करणे हा फौजदारी गुन्हाच ठरविला जावा. तरच काहीसे साध्य होऊ शकते अन्यथा कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेप्रमाणे महाराष्ट्रातील कुणबी मरायला नाही तर  मारायला शिकतील यात तिळमात्र शंका नाही.

                                                                                             पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

Tuesday, December 17, 2013

देवयानींचा अवमान

जगभरात दादागिरी करीत मिरविणा-
या अमेरिकेला कायद्याचे आणि सुसंस्कृतपणाचे काही सोयरसुतक नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. असे काय केले अमेरिकेने, तर भारताच्या डेप्युटी कॉन्सिल जनरल अर्थात उपमहावाणिज्यदूत डॉ. देवयानी खोब्रागडे यांना बेकायदेशीरपणे अटक केली, एवढेच नाही तर डॉ.देवयानी यांचे कपडे उतरवून
अपमानास्पदरीत्या तपासणी केली.
त्यामुळे  तमाम भारतीयांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे. गतवर्षी १६ डिसेंबरला दिल्लीत घडलेल्या निर्भया   सामूहिक बलात्कार प्रकरणाला वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने निर्भयाला सर्व स्तरांतून सारा देश श्रद्धांजली वाहात
असतानाच, देवयानीचे कपडे उतरविण्याची घटना घडली. महिला अत्याचाराबद्दल  भारत सरकारने नवा कायदा केला; पण  वर्ष उलटून गेले तरी समाजमनात या कायद्याची काहीच जरब बसली नाही. आता परदेशातही भारतीय महिला सुरक्षित नसल्याचे आढळून येत आहे. अमेरिकेत व्हिसा घोटाळा आणि घरी मुलीला सांभाळण्यासाठी भारतातून बोलाविलेल्या
महिलेचे आर्थिक शोषण केल्याच्या आरोपाखाली न्यूयॉर्क पोलिसांनी मॅनहटनमधून डॉ.देवयानी खोब्रागडे यांना अटक केली. देवयानी भारतीय डिप्लोमॅट असल्याने त्यांना राजकीय संरक्षण आहे; पण या विशेषाधिकाराचे अमेरिकेने उल्लंघन करीत सार्वजनिक ठिकाणी हातात बेड्या घातल्या. त्यांचे कपडे उतरवून तपासणी केली आणि सेक्स वर्करबरोबर उभे केले.   त्यामुळे त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली. याप्रकरणी आपण दोषी नसल्याचे त्यांनी न्यायालयात स्पष्ट केल्यानंतर अडीच लाख अमेरिकी डॉलर्सच्या जामिनावर त्यांची
मुक्तता करण्यात आली. हे अमेरिकेचे कृत्य अत्यंत घृणास्पद, qनदणीय असेच आहे. डॉ. देवयानीचे एक प्रकारे शोषणच केले गेले. हा सगळा प्रकार संतापजनक आहे. अमेरिकेच्या या कृतीवरून त्यांचा भारतीय लोकांबद्दलचा आकस दिसून येतो. लष्करी आणि आर्थिक सामथ्र्याची घमेंड असणा-या अमेरिकेला इतर देश हे तुच्छ वाटतात. अमेरिका भारतासोबत नेहमी दुटप्पीपणाचे धोरण अवलंबित आले आहे. देवयानी यांच्या अपमानाच्या घटनेनंतर भारत सरकारने अमेरिकेच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर भारत दौèयावर आलेल्या अमेरिकेच्या शिष्टमंडळाची भेट घेण्यास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार qशदे, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी नकार दिला. तसेच अमेरिकेचा निषेध करण्याची धमक दाखविली हे विशेष. दरम्यान अमरिकेने या प्रकरणी माफी वगैरे न मागता उलट देवयानी यांच्यासोबत जे केले ते योग्यच केले. ती एक मानक प्रक्रिया असते, असा निर्लज्जपणे निर्वाळा दिला आहे; परंतु अमरिकेने दाखविलेल्या दादागिरीवर भारताने त्यांना त्यांची लायकी दाखवून द्यायला हवी. डॉ. देवयानी  ही विदर्भ कन्या असून ती सेवानिवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांची कन्या आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन तिने भारताचे उपमहावाणिज्यदूत पदापर्यंतची मजल मारली. यापूर्वी जर्मनी, पकिस्तान, इटली, नवी दिल्ली येथील परराष्ट्र खात्यात अधिकारी म्हूणन सेवा केलेली आहे. त्यांनी मुंबईच्या जी. एस. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी मिळविली आहे. या मराठी महिलेचे कपडे उतरवून तपासणी केल्याच्या प्रकाराने महाराष्ट्रातूनही चीड व्यक्त केली जात आहे. झाल्या प्रकारावर अमरिकन सरकारने माफी मागितली पाहिजे तसेच निषेध म्हणून भारत दौèयावर आलेल्या अमेरिकन शिष्टमंडळाचीही अपमानास्पदरीत्या हकालपट्टी करायला हवी. अमेरिकेने यापूर्वीही भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस,  अभिनेते शाहरूख खान यांची अशाच प्रकारे अपमानास्पद
तपासणी केली होती. त्याहीवेळी वादळ निर्माण झाले होते. अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी भारत सरकारने अमरिकेला धडा शिकविण्याची गरज आहे.

                                                                         पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

Wednesday, December 11, 2013

विरोधकांचा ‘जादूटोणा'


जादूटोणाविरोधी कायदा  अस्तित्वात येऊन  पुरोगामी म्हणून गणल्या जाणा-या महाराष्ट्रातील अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला चाप बसावा यासाठी अंधश्रद्धानिर्मूलन समितीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. पण सरकारने गेली चौदा वर्षे  हे जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर न करता केवळ वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले होते. दरम्यान या कायद्याला विरोध करणा-या सनातन्यांनी  दाभोलकरांचा घात केला आणि या विधेयकाने पुन्हा उचल खाल्ली. दाभोलकरांच्या मृत्यूनंतरच सरकारचे डोळे उघडले असे म्हणता येईल.  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने या विधेयकावर वटहुकूम काढला, सगळ्यांना बरे वाटले; पण या वटहुकुमाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात पारित होणे आवश्यक होते. मुख्यमंत्र्यांनीही या विधेयकाबाबत सकारात्मक भूमिका मांडली होती; पण गेल्या पावसाळी अधिवेशनात या विधेयकावर साधी चर्चाही करण्यात आली नाही आणि दाभोलकरांच्या मारेक-
यांना अद्याप अटकही करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यात सरकारच्या विरोधात असंतोष पसरू लागला. मोर्चे, निदर्शने, धरणे अशी आंदोलने करण्यात येत होती. याचा परिणाम म्हणून आता राज्य सरकार हे विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी मांडण्यास तयार झाले आहे. एवढेच नाही तर  हे विधेयक एकमताने मंजूर करावे, असे आवाहनही
मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षांना केले. त्यावर सर्व पक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात आली; परंतु या बैठकीत विरोधकांनी या विधेयकातील अनेक तरतुदींना विरोध केला, शब्दांची मोडतोड केली आणि विधेयकातील जादूच काढून टाकली. या विधेयकातील भोंदू वैदू, भोंदू बाबा शब्द वगळण्यात आले आणि भोंदू लोक, अंधश्रद्धेऐवजी अज्ञान, दैवीशक्ती ऐवजी अतिंद्रिय, मेंटली रिटायर्ड असे शब्द वापरण्यात आले आहेत. शिवाय मंत्र-तंत्र, देवदेवस्की हे शब्दही या कायद्यातून वगळण्यात  आले आहेत. qवचू, साप, कुत्रा चावल्यावर मंत्रोच्चाराला बंदी नाही, मंदिर, दर्गा आणि घरी भूत उतरवणे यावरही बंदी नाही. संतांचे चमत्कार सांगण्यावर बंदी नाही. प्राचीन विद्यांचा प्रचार आणि प्रसाराला बंदी नाही. यात्रा, प्रदक्षिणा, परिक्रमा यांना हा कायदा लागू नाही,  अशी या विधेयकांतील तरतुदींची मोडतोड करण्यात आली. सरकारलाही हे मान्य झाले. त्यामुळे  विरोधकांनी या विधेयकातील ‘रामङ्क च काढून टाकला आहे. आता हे विधेयक निष्क्रिय आणि अधुरे झाल्याने हे विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजुरही होईल; पण ते प्रभावी असणार नाही. अंधश्रद्धेवर नियंत्रण आणण्यासाठी हा कायदा निरस असेल. जादूटोणाविरोधी कायदा करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याच्या जाहिराती झळकावून पुरोगामीपणाचा आव आणणारे सरकारही या विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदींना फाटा देऊन प्रतिगामी, सनातन्यांच्या रांगेत जाऊन बसले आहे. बुधवारी हे विधेयक विधीमंडळात सादर करण्यात येणार आहे. ही बाब आशादायी वाटत असली तरी या विधेयकातील तरतुदींची मोडतोड ही बाब अत्यंत निराशादायी आहे. शरीरातून प्राण काढून घ्यावेत आणि शरीर निर्जीव व्हावे त्याप्रमाणे या जादूटोणा विधेयकाची अवस्था सनातनी विचारांच्या महाभागांनी केली आहे. त्यास सरकारही तेवढेच जबाबदार आहे. नरेंद्र दाभोलकरांचे सुपुत्र हमिद दाभोलकर यांना  या मोडतोडीच्या विरोधात नागपुरात विधानभवनासमोर पुन्हा आंदोलन सुरू  करावे लागले आहे. सरकारला थोडीही पुरोगामीपणाची चाड असेल तर जादूटोणा विधेयकातील किरकोळ दुरुस्त्या वगळता विधेयक जसेच्या तसे कसे मंजूर करून घेता येईल, हे पाहिले पाहिजे. तरच हा कायदा करण्याला अर्थ आहे, अन्यथा हा कायदा निरर्थक ठरेल हे निश्चित.

                                                                                               पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत

Saturday, December 7, 2013

वर्णभेदविरोधी लढ्याचा महानायक

क्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि वर्णद्वेषविरोधी लढ्याचे उध्वर्यू नेल्सन मंडेला यांचे फुफ्फुसांमधील जंतुसंसर्गाच्या आजाराने शुक्रवारी जोहान्सबर्गमध्ये त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.  मंडेला यांच्या निधनाने एका क्रांतिकारी पर्वाचा अन्त झाला. ९५ वर्षांच्या या नोबेल आणि भारतरत्नविजेत्या नेत्याच्या कार्यकर्तृत्वावर एक दृष्टीक्षेप...
-----------------------------------------------------------------------------------------------------
प्रवाहाविरुद्ध जाण्याची निर्भिडता, सत्यता, ध्येयवाद आणि सर्वस्व झोकून देण्याची सिद्धता
असणारा आणि विषमतेला भेदून समतेचे कलमीकरण करणारा क्रांतिकारी महापुरुष  आणि दक्षिण आफ्रिकेचा मदिबा अर्थात राष्ट्रपिता, पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी  शुक्रवारी ६ डिसेंबरला पहाटे जोहान्सबर्ग येथे निधन झाले.  भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी मंडेला नावाच्या आणखी एका समतेच्या सूर्याचा अस्त झाला. तमाम भारतीयांनी बाबासाहेबांबरोबरच मंडेलांनाही अभिवादन केले. मंडेला यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता दक्षिण आफ्रिेकेत क्रांती घडवून आणली. काळे आणि गोरे अशा वर्णभेदाला अqहसेच्या मार्गाने मुठमाती देऊन कृष्णवर्णीयांच्या अंधारमय जीवनात प्रकाश आणला. अशा या नेत्याची गेल्या साडेपाच महिन्यांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली आणि ६ डिसेंबरला मंडेला
नावाचे वादळ शमले.
वर्णभेद आणि वंशवादाच्या विरोधात आवाज बुलंद करणा-या मंडेला यांनी आयुष्यभर महात्मा गांधी यांच्या आदर्शांवर वाटचाल केली. दक्षिण आफ्रिकेचे महात्मा गांधी म्हणूनही त्यांना संबोधले जात होते. सुमारे तीन शतकांच्या वर्ण वर्चस्ववादानंतर दक्षिण आफ्रिकेस लोकशाही राष्ट्र बनविण्याचे श्रेय मंडेला यांच्याकडेच जाते. त्यांनीच काळ्या आफ्रिकन माणसांना न्याय हक्क मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेत काळ्या आफ्रिकन लोकांचा
अनन्वित  छळ केला जात होता त्यामुळे या लोकांच्या न्याय हक्कांसाठी मंडेला यांना लढा उभारावा लागला. आपल्या समृद्धीसाठी आणि आनंदासाठी ज्या अमेरिकन धनदांडग्यांनी आणि सरंजामी वृत्तीच्या गोèयांनी आफ्रिकेच्या किना-यावर
आपली जहाजे पाठवून तिथल्या काळ्या लोकांना साखळदंडांनी बांधून त्यांच्या देशात नेले. त्यांना गुलाम बनवून त्यांच्या घामावर एक देश उभा केला. त्याच गो-यांनी त्यांच्या माणूसपणाचे हक्क नाकारले. त्यांना प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली. या अन्याय-अत्याचाराविरुद्ध तत्कालिन नेते मार्टिन ल्यूथर qकग यांनी अशा गुलामांना संघटित करून आवाज उठविला; पण त्यानंतर लगेच त्यांची हत्या झाली. त्यानंतरही काळ्या माणसांचा छळ सुरूच होता. खाणीतून मिळणारे हिरे, सोने यांच्या लोभाने आलेल्या ब्रिटिशांनीही काळ्या माणसांकडे श्रम करणारे एक शरीर एवढेच पाहिले. मंडेला यांनी वर्णभेदाच्या विरोधात लढा उभारला आणि समतेचा नारा देत आंदोलन सुरू केले. ते सांगत की, मी केवळ गो-यांकडून होणा-या अन्यायाच्याच नाही तर काळ्यांकडून होणा-या अन्यायाच्या विरोधात आहे. मी एक लोकशाहीवादी आणि स्वातंत्र्यांचा समर्थक आहे. ज्यात सगळे समान असतील आणि सगळ्यांना
समान संधी मिळेल. त्यांनी  वर्णभेद आणि वंशवादाविरोधात शांततामय मार्गाने संघर्ष केला. १९५२ ते १९६४ दरम्यान दक्षिण आफ्रिकेत शांततेच्या मार्गाने वर्णभेदाविरुद्ध निदर्शने, आंदोलने केली जात होती. त्या दरम्यान  शार्पविल येथे भीषण हत्याकांड घडले ज्यात ९६ लोक मारले गेले.
तेव्हापासून मंडेला यांच्या आंदोलनाची दिशा बदलली. त्यांना वाटत होते की, आता अहिंसेने काहीही साध्य होणार नाही. मात्र त्यांनी नाउमेद न होता अहिंसेचा मार्ग सोडला नाही. मंडेला यांना ५ ऑगस्ट १९६२ ला अटक करण्यात आली. त्यांनी आपल्या आयुष्याची २७ वर्षे रॉबेन द्वीपच्या तुरुंगात घालवावी लागली. तुरुंगातही त्यांना वर्णभेदाचा अनुभव आला. तिथे काळ्या लोकांना वेगळे ठेवले जात होते शिवाय त्यांना जेवणही कमी दिले जायचे. तुरुंगात असतानाच मंडेला यांची लोकप्रियता जगभर वाढत गेली आणि त्यांना दक्षिण आफ्रिकेतील एक महत्त्वपूर्ण नेता म्हणून मानले जाऊ लागले. १९९० मध्ये त्यांची सुटका झाली. त्यानंतर चार वर्षांनंतरच १९९४ मध्ये ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या बॅनरखाली ते लोकशाही पद्धतीने निवडून
आलेले पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले. १९९४ ते १९९९ पर्यंत ते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. न्यायाचा विचार केवळ गुन्ह्याला शिक्षा असा न करता वेगळा काही असू शकतो, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांच्या या विचारमूल्य आणि ऐतिहासिक कार्यामुळे त्यांना १९९३ मध्ये शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर १९९० मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न  हा देशातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार देऊन गौरविले आहे.
कौटुंबिक पाश्र्वभूमी
नेल्सन  रोहिल्हाला मंडेला यांचा जन्म १८ जुलै १९१८ साली केप प्रांताच्या कुनु त्रांसकेई (मवेजा)
गावात झाला. मंडेला यांचे वडील गेडला हेनरी गावाचे प्रधान होते. त्यांच्या कुटुंबाचा संबंध शाही कुटुंबाशी होता. मंडेला यांची आई एक मेथडिस्ट ख्रिश्चन होती. मंडेला यांचे शालेय शिक्षण क्लार्क बेरी मिशनरी शाळेत झाले. विद्यार्थी अवस्थेतच त्यांना वर्णभेदाचे चटके सहन करावे लागले. शाळेतच त्यांना सांगितले जायचे की, तुझा रंग काळा आहे, जर तू ताठ मानेने चाललास तर तुला अटक होऊ शकते. अशा अनेक अपमानजनक गोष्टींचा त्यांच्या मनावर
खोलवर परिणाम झाला. मंडेला यांनी हेल्डटाऊन येथून पदवी घेतली. केवळ काळ्या लोकांसाठी असलेले ते महाविद्यालय होते. त्याशिवाय त्यांनी अफ्रिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ फोर्ट हेयर, लंडन युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ विटवाटरसॅरेंडमध्ये उच्च शिक्षण झाले. १९४० पर्यंत नेल्सन आणि ऑलिवर आपल्या
विद्रोही राजकीय विचारांच्या कारणाने महाविद्यालयात चर्चेत होते त्यामुळेच त्यांना महाविद्यालयातून बाहेर करण्यात आले. त्यानंतर त्यांनी जोहान्सबर्ग गाठले. तिथे त्यांनी एक नोकरी मिळविली. मात्र नोकरी करीत असताना त्यांना काळे असल्यामुळे रोजच अपमानाचे चटके सहन करावे लागत. १९४४ मध्ये त्यांनी त्यांचा मित्र वाल्टर सिसुलू यांची बहिण इव्हलिन एनतोको मेस यांच्याशी विवाह केला. त्यानंतर त्यांनी विनी मंडेला आणि नंतर ग्रेसा माशेलसोबत विवाह केला. विनी मंडेलांशी त्यांचे जास्त काळ पटले नाही कारण विनी मंडेलाला अधिक राजकीय महत्त्वाकांक्षा होती त्यामुळे ते वेगळे झाले.
दक्षिण आफ्रिकेचा ‘महात्माङ्क
नेल्सन मंडेला यांनी जीवनभर महात्मा गांधी यांच्या विचार मूल्यांवर वाटचाल केली. मंडेला यांना दक्षिण आफ्रिकेचे महात्मा गांधी म्हणून संबोधले जाते. कारण दोघांच्याही विचारांमध्ये बहुतांशी साम्य होते. १९९९ मध्ये मंडेला यांना अqहसेच्या जागतिक आंदोलनासाठी गांधी-qकग एडवर्ड पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना हा पुरस्कार महात्मा गांधी यांची नात इला गांधी यांच्या हस्ते देण्यात आला होता. मंडेला यांनी तुरुंगात असताना महात्मा गांधी यांच्याशी संबंधित अनेक ग्रंथांचे वाचन केले. मंडेला यांनी आपली संपूर्ण संघर्षमय वाटचाल गांधींनी सांगितलेल्या मार्गावरून केली.
१९९९ मध्ये आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मंडेला यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतला होता. त्यानंतर ते आपल्या जन्मगावी कुनु त्रांसकेई येथे जाऊन आपले आयुष्य शांतपणे व्यतीत करीत होते. जुलै २०१० मध्ये ते सार्वजनिकरित्या लोकांसमोर आले होते. त्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांमध्ये जंतुसंसर्ग झाला होता त्यामुळे मार्च २०१३ मध्ये त्यांना उपचारासाठी प्रीटोरिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारली होती. मात्र पुन्हा त्रास होऊ लागल्याने जूनमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांच्या प्रकृतीबद्दल सा-या जगातून qचता व्यक्त केली जात होती. ठिकठिकाणी  मंडेला यांचे प्राण वाचावेत म्हणून प्रार्थना केल्या जात होत्या. अखेर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने जगभरातून शोक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात
आहेत. मंडेला यांच्या निधनाने इतिहास रचणा-या एका क्रांतिकारी पर्वाचा अन्त झाला आहे. अशा या थोर नेत्यास त्रिवार अभिवादन !

Wednesday, December 4, 2013

मतदार प्रगल्भ होतोय

पाच पैकी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकांमध्ये काँगे्रस आणि भारतीय जनता पक्षाने आपली संपूर्ण शक्ती आणि बुद्धी पणाला लावली असून  लोकांच्या मनात या निवडणुकीच्या निकालाबद्दल मोठी उत्सुकता  निर्माण झाली आहे, कारण या चार राज्यांमध्ये विक्रमी असे मतदान झाले आहे.  त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेचे पेव फुटले आहे. एवढे मतदान झाले कसे आणि हे मतदान कोणाच्या पारड्यात qकवा कोणाच्या विरोधात झाले, याचा अंदाज लावणे तितकेसे सोपे नाही. छत्तीसगडमध्ये
७५ टक्के, राजस्थान
७४ टक्के, मध्य प्रदेश ७१ टक्के आणि मिझोराममध्ये तब्बल ८० टक्के असे मतदान झाले आहे. त्यामुळे यावेळी झालेल्या विक्रमी मतदानाचा अर्थ काय, याचा शोध घेण्यात राजकीय अभ्यासक मश्गुल आहेत. जो-तो आपापल्यापरीने याचा अर्थ लावत असला तरी एक मात्र निश्चित की, आता मतदार शहाणा होत आहे, त्याच्यात जागृती होत आहे,  हेच या मतदानाच्या वाढत्या आकडेवारीवरून दिसून येते. आता दिल्लीमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान होईल अशी शक्यता आहे. छत्तीसगडसारख्या नक्षलग्रस्त राज्यातही मोठ्या प्रमाणात मतदान झाले. लोकांमध्ये राजकीयदृष्ट्या जागृती निर्माण झाली आहे. आपल्याकडे मतदानाबद्दल सर्वसाधारणपणे एक रूढ समज आहे की, मतदान जास्त झाले की ते सत्ताधाèयांच्या विरोधात असते, कारण लोकांची मानसिकता प्रस्थापितांच्या विरोधात असते. सरकारच्या विरोधात राग असतो तेव्हा सत्ताधाèयांना धडा शिकविण्यासाठी लोक आवर्जून मतदान करीत असतात. याचाच अर्थ असा की, जास्तीचे मतदान झाले की सत्तांतर होणार असा आडाखा बांधला जातो.  त्याप्रमाणे छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे तिथे झालेल्या विक्रमी मतदानावरून तेथील भाजपची
सत्ता जाणार असा अंदाज काँग्रेसजनांनी व्यक्त केला आहे; परंतु अधिक मतदानाचा
अर्थ सत्तांतर असा घेतला तर राजस्थानमध्येही विक्रमी मतदान झाले आहे. मग  या राज्यातील काँग्रेसची सत्ता जाणार असाच अर्थ घ्यावा लागेल. याउलट राजस्थानचे
 मुख्यमंत्री अशोक गहलोत याचा अर्थ काँग्रेसचा एकतर्फी विजय होणार असा  काढत आहेत. जास्तीचे मतदान झाले की सत्तांतर निश्चित, हा फंडा राजकीय नेते आपल्या सोयीनुसार वापरत असतात. वास्तवात  मात्र निवडणुकांचे निकाल धक्कादायक येतात. भाजपने तर तिन्ही राज्यांत आपणच qजकू असा दावा केला आहे. तो कितपत सत्यात उतरतो हे पाहण्यासाठी घोडा मैदान दूर नाही.  जास्तीचे मतदान झाल्यास सत्तांतर होते, हे सूत्र गुजरातमध्ये फेल गेलेले आहे. गेल्या चार निवडणुकांमध्ये गुजरातमध्ये मतदानाचा टक्का वाढत गेला; पण तेथील सत्ताधारी
नरेंद्र मोदी कधीही पराभूत झाले नाहीत. उलट त्यांच्या जागा वाढत गेल्या. त्यामुळे
जास्तीचे मतदान झाले की सत्तांतर होतेच असे काही ठामपणे म्हणता येणार नाही. जास्तीचे झालेले मतदान हे सत्ताधाèयांच्या की विरोधकांच्या पारड्यात जाणार,  याचा अंदाज राजकीय अभ्यासक लावत आहेत. चार राज्यांत झालेले
 हे विक्रमी मतदान वीस ते तीस वर्षे वयोगटातील महिला आणि तरुणाईचे आहे. हे मतदान केद्र सरकारने वाढविलेल्या महागाई, भ्रष्टाचारविरोधातील आहे की त्या-त्या राज्यातील स्थानिक प्रश्नांवर झालेले आहे  हे  येत्या ८ डिसेंबरलाच स्पष्ट होईल; परंतु या पाच राज्यांतील निवडणुकांचा निकाल हा आगामी लोकसभा निवडणुकीची नांदी ठरणार आहे. यावरून २०१४ च्या लोकसभेचे चित्र स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे या पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालाला महत्त्व आलेले आहे.  मतदान केंद्रावरील युवा मतदारांच्या वाढत्या रांगांवरच देशाचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे मतदानाची वाढती टक्केवारी विचारप्रवर्तक अशी आहे.
     
                                            000 पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

Tuesday, November 26, 2013

मराठवाड्यासाठी उठाव



मराठवाड्याच्या विकासप्रश्नांवर आतापर्यंत बराच काथ्याकूट झाला; पण पदरात काहीच पडले नाही. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळाले
नाही, अनुशेषाचा प्रश्न तसाच खितपत पडून आहे. अपूर्ण qसचन प्रकल्प, दुष्काळसदृश्य स्थिती,  रस्ते, वीज, उद्योग, रेल्वेमार्गाचे प्रश्न रेंगाळलेलेच आहेत. या भागातील नेतृत्व दुबळे असल्याचेच हे द्योतक आहे. वसमतला पार पडलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनातही मराठवाड्याच्या रखडलेल्या विकासप्रश्नांवर सांगोपांग,  मुद्देशीर चर्चा झाली. अनेक चर्चासत्रांतून, परिसंवादांतून विकासावर चांगलाच खल केला जातो, तासन् तास चौफेर चर्चा केली जाते; पण साध्य काहीच होत नाही, हा आजपर्यंतचा लोेकांचा अनुभव आहे. डोळस मराठवाडा आणि आंधळे नेतृत्व असल्यानंतर काय निष्पन्न होणार आहे, हे सांगणे नको. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत २००५ ते २००८ या काळात औरंगाबादेत मंत्रिमंडळाच्या बैठका नियमित झाल्या; पण २००८ नंतर  बाबा, दादा आणि आबांच्या काळात या बैठकांची प्रथा गुंडाळली गेली. लोकनेते विलासराव देशमुख यांच्यानंतर  मराठवाड्याचे प्रश्न राज्य स्तरावर प्रभावीपणे मांडू शकेल असे नेतृत्व सध्या मराठवाड्यात नाही. त्यांच्याच काळात औरंगाबाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन वर्षांसाठी मराठवाड्याला १८५३.१९ कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. तेव्हापासून विकासासाठी एकही दमडी मिळालेली नाही. त्यासाठी कोणी  लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन विधानसभेत पाठपुरावाही करताना दिसत नाहीत. मध्यंतरी  पाणीप्रश्नावर विधानसभेत काही आमदारांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला, एवढेच. परवा नांदेडमध्ये विकासाच्या प्रश्नावर पुन्हा काही लोकप्रतिनिधी एकत्रित आले. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेऊन विकासाचा सात सूत्री कार्यक्रम राबविण्याचा संकल्प केला गेला. त्यात विविध विकास प्रश्नांवर शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल, न्यायालयीन लढाई लढली जाईल, मराठवाड्यातील रस्ते, वीज आणि अपूर्ण qसचन प्रकल्प तसेच रेल्वे प्रश्नावर प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी दर्शविण्यात आली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची यावेळी उपस्थिती होती. या भागातील ४८ पैकी अवघे १३ आमदार  बैठकीला हजर  होते, तर इतर लोकप्रतिनिधींनी मात्र हाताची घडी  आणि तोंडावर बोट, असेच धोरण स्वीकारले. ते या बैठकीला का आले नाहीत, हा एक वेगळा संशोधनाचा प्रश्न आहे.  मराठवाड्याच्या विकासप्रश्नावर आता मवाळ धोरण सोडून विधानसभेत आक्रमक व्हावे लागेल, अशी भूमिका  बहुतांश आमदारांनी बैठकीत मांडली. राज्यपालांना भेटून या भागाची व्यथा सांगावी, असेही ठरविण्यात आले. नांदेडच्या बैठकीने एक आशादायी चित्र उभे केले असले तरी जोपर्यंत त्यांनी ठरविलेल्या सात सूत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. राज्यात सरकार कोणाचेही असो मराठवाड्याच्या नशिबी मात्र नेहमी धोंडाच आहे. राज्यातील प्रशासन आणि प्राधिकरणाने  सातत्याने मराठवाडाविरोधी भूमिका घेतल्याने मराठवाड्यावर अन्याय होत आला आहे.  हे खरे असले तरी या भागातील लोकप्रतिनिधींची उदासीनता याला कारणीभूत आहे. मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी पुढाकार घेऊन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना विकासाच्या प्रश्नांसाठी पुढे केले आहे. आता त्यांच्या नेतृत्वात कोण कोण आणि किती सर्वपक्षीय आमदार  विधासभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मराठवाड्याच्या विकासप्रश्नावर आवाज उठवतील आणि मराठवाड्याच्या पदरात काय पाडून घेतील, हे येणारा काळच ठरवील.
                                                   
                                                पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

Thursday, November 21, 2013

शेतमजुरांशी दुजाभाव!

कष्टकरी, कामगार, भूमिहिन शेतमजूराची महती सांगताना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे म्हणतात, पृथ्वी शेषाच्या फण्यावर उभी नसून कामगारांच्या तळहातावर तरली आहे. तर कवी माधव जाधव यांनी कष्टक-
यांचा घाम सा-या जगाला जगवित असल्याचे सार्थ वर्णन  आपल्या कवितेतून केलेले आहे.पण सद्यस्थितीत शेतमजूर, कामगारांची अवस्था अत्यंत वाईट अशी आहे.अन्न नाही, पाणी नाही, हाताला काम नाही, सरकारची कसलीही मदत नाही, अशी बत्तर परिस्थिती मराठवाड्यातील लाखो शेतमजूर व अन्य मजुरांची आहे. तरीही त्यांच्या प्रश्नांकडे सरकार अद्याप गांभीर्याने पाहत नाही. केंद्र आणि राज्यातील आघाडी सरकार कोट्यवधी रूपयांचे पॅकेज विविध विकास कामांसाठी आणि समस्या सोडविण्यासाठी जाहीर करत  आहे. पण शेतमजूर, कामगारांसाठी एखादे पॅकेज जाहीर केलेले कधी ऐकिवात नाही. उलट रोजगार हमी योजना व वन अधिकार कायदा मोडित काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो आहे. यामुळे देशभरातील लाखो शेतमजूर रोजगार आणि जमिनीच्या अधिकारापासून वंचित राहत आहेत. सरकारच्या जागतिकीकरणाच्या आर्थिक धोरणामुळे शेती व्यवस्थाच पूर्णत: विस्कटली जात आहे. त्यामुळे मजुरांना पुरेसा रोजगारही उपलब्ध होत नाही.त्यात महिलांना तर दुय्यम स्थान देऊन त्यांना पुरुषांच्या बरोबरीने काम करूनही पुरुषांपेक्षा निम्मी मजूरी दिली जात आहे. घरची कामे सांभाळून पुरुषांइतकेच काम करीत असतानाही त्यांची अशी पिळवणूक केली जात आहे. सरकारने किमान वेतन कायदा लागू करून तीन वर्षे उलटले पण कामगारांना प्रत्यक्ष मिळणा-या वेतनात मोठी तफावत आहे. शेतमजुरांनाही हा कायदा लागू आहे. परंतु मराठवाड्यात या कायद्याची अंमलबजावणीच होताना कुठे दिसत नाही.  आणि यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा सुद्धा अत्यंत निष्क्रिय अशी आहे. अशा स्थितीत पुरेशा प्रमाणात मजुरी मिळत नसल्याने आणि वाढत्या महागाईने कहर केल्याने कामांतून मिळणा-या तुटपुंज्या पैशात घरसंसार कसा चालवावा, हा  मजुरांसमोरील एक यक्ष प्रश्न आहे. पण उन्हातान्हात घाम गाळण्याशिवाय शेतमजुरांजवळ पर्यायच नाही. शिवाय कोणतीही सुरक्षितता नसल्याने त्यांचे जगणे वेठबिगारासारखेच बनले  आहे. विविध आर्थिक विकास महामंडळाकडून लघुउद्योगांसाठी जी तुटपुंजे कर्जे दिली जातात. त्यातून साध्य काहीच होताना दिसत नाही. कर्ज काढून काही शेळ्या खरेदी केल्या तर त्या कोणाच्या शेतात चाराव्यात? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे, मिरची कांडप यंत्र घेतले तर गावातील जातीयव्यवस्थेमुळे हा व्यवसायही चालत नाही. असा गोरगरीब मजुरांचा कोंडवाडा होतो. तसेच गेल्या काही वर्षांत ३५ टक्के शेतकरी भूमीहिन झाल्यामुळे  शेतमजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करावे लागत आहे.  मजुरांची सर्वच बाजूंनी अशी गळचेपी  होत आहे. काही बोटावर मोजण्याइतपत संघटना शेतमजूर, कामगारांच्या जगण्याचे मुलभूत प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला, पण सरकारला याचे काही सोयरसुतक दिसत नाही. रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी, शेतमजुरांसाठी सर्वकष असा केंद्रीय कायदा करून निधीची तरतूद करावी, सर्व मजुरांना स्वस्त धान्य दुकानांवर ३५ किलो धान्य आणि जीवनाश्यक वस्तू द्याव्यात. वन, गायरान, सरकारी पडीक,जमीन कसणा-यांच्या नावे करावी आणि वनअधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी,  अशा मागण्या अनेक वर्षांपासून केल्या जात आहेत. शेती आणि शेतकरी टीकला पाहिजे, त्यांच्यासमोरी समस्या सुटल्या पाहिजेत,याबद्दल दुमत नाही, पण सरकारने देशाच्या पायाभूत विकासात मोलाचे योगदान देणारे आणि सकल गृह उत्पादनात भर घालणाèया शेतमजुरांचे प्रश्न सोडविताना दुजाभाव करू नये, अशी रास्त अपेक्षा या श्रमिकांची आहे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत एवढेच.
                                               
                                                     पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

Wednesday, November 6, 2013

लातूरचा पाणीप्रश्न ‘रामभरोसे,

यंदाच्या पावसाळ्यात अध्र्या मराठवाड्यात ब-यापैकी पाऊस झाला. मात्र बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात खूप कमी पाऊस झाला त्यामुळे 
जमिनीतील आणि विविध प्रकल्पांतील पाण्याची पातळी वाढलीच नाही.  मराठवाड्यात अजूनही दुष्काळसृदश्य परिस्थिती असून उस्मानाबादला दोन
दिवसाआड तर लातूरला आठ दिवसांना पाणीपुरवठा केला जातो. लातूर शहरापासून
७० किमी अंतरावरील धनेगावच्या मांजरा धरणातून हा पाणीपुरवठा केला जातो.
प्रामुख्याने या धरणातील पाण्याचा वापर लातूर शहर आणि औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठ्यासाठी केला
जातो. यंदा धरणाच्या वरील भागात चांगला पाऊस न झाल्याने सध्या धरणात मृत पाणीसाठा आहे त्यामुळे लातूरचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. ऑक्टोंबरअखेर शासकीय आकडेवारीनुसार मांजरा धरणातील एकूण पाणीसाठा केवळ १४.४७३ दलघमी इतका असून हा मृत पाणीसाठा आहे. तर उपयुक्त पाणीसाठा शून्यावर गेला आहे. जिल्ह्यातील इतर प्रकल्पांचीही अशीच बिकट पाणीअवस्था आहे. डिसेंबरनंतर तर लातूरकरांना पाणी संकटाचा मोठा सामना करावा लागेल. पैसे देऊनही पाणी मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होण्याची  शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. पाण्याची काटकसर करावी लागणार आहे अन्यथा थेंब थेंब पाण्यासाठी भटकंती वाट्याला येऊ शकते. सध्या लातूरकरांना आठ दिवसांना पाणी मिळते. नळाला तासभर येणारे पाणी आठ दिवसही पुरत नसल्याने नागरिकांना आठवड्यातून एकदा तरी खाजगी पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागते त्यासाठी चारशे ते पाचशे रुपये मोजावे लागतात. एवढेच नाही तर पाण्यावरून ठिकठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवतात. अनेक जण पिण्याच्या पाण्याअभावी इतरत्र स्थलांतर करीत आहेत. पाणीटंचाईचा राक्षसी प्रश्न समोर असताना लातूरच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याबद्दल निव्वळ चर्चाच सुरू आहेत. शहराच्या पाणीपुरवठ्याचे कसलेही ठोस नियोजन होताना दिसत नाही. पाण्याबाबत महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे  पदाधिकारी, अधिकाèयांमध्ये प्रचंड उदासीनता दिसून येते. शहरात qवधन विहिरी घेतल्या जात नाहीत, की नवे जलस्त्रोत शोधूले जात नाहीत. शहरवासीयांची तहान भागविण्याचे नियोजनच नाही. लातूरच्या पाण्याची आवश्यकता पाहून लोकनेते विलासराव देशमुख
यांनी बॅरेजेसची उभारणी केली. या बॅरेजेसमुळे पाण्याची उपलब्धी होऊ शकते.
फेबु्रवारी २०१४ नंतर पावसाळ्यापर्यंत भंडारवाडी मध्यम प्रकल्प qकवा खुलगापूरच्या बॅरेजचे पाणी आणण्याचा प्रशासन विचार करीत असल्याचे सांगितले जाते; पण हे काम प्रत्यक्षात अजूनही सुरू झालेले नाही. खरे तर जीवन प्राधिकरणासह सर्व जबाबदार पदाधिकारी, अधिकाèयांनी लातूरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ठोस अशी पावले उचलण्याची गरज आहे. लातूरच्या पाणीटंचाईबाबत महापालिका गंभीर असून यासंदर्भात मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संभाव्य पाणीटंचाईची त्यांना कल्पना दिली तसेच त्यांनी सूचविल्याप्रमाणे जीवन प्राधिकरणसोबत समन्वय साधून ३२ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती महापौर स्मिता खानापुरे यांनी नुकतीच दिली. मात्र पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय हेवदावे बाजूला सारून सर्व नेत्यांनी एकत्रित येण्याची खरी आवश्यकता आहे तसे झाले तरच लातूरकरांची तहान भागणार आहे. अन्यथा घशाची कोरड नशिबी आल्याशिवाय राहणार नाही. लातूरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आणखी एक उपाय पुढे येत आहे. तो म्हणजे लातूर शहराला पाणीपुरवठ्यासाठी नांदेड जिल्ह्यातील मन्याड खोèयातील qलबोटी या मोठ्या धरणातून पाणी आणणे शक्य आहे. हा प्रकल्प धनेगाव मांजरा इतरकाच ७० ते ८० किमी अंतरावर आहे. अहमदपूर, चाकूरमार्गे जलवाहिनी टाकून पाणी आणले जाऊ शकते त्यासाठी राज्य सरकारकडून  मदत घेता येईल. लिंबोटीचे पाणी लातूरला आणले तर भविष्यात लातूरकरांना कधीच पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावू शकणार नाही.
                                                                         पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

Tuesday, October 29, 2013

दया नावाचे वादळ शमले

 सध्याच्या काळात सर्वच पुरोगामी चळीवळी थंडावल्या आहेत, चळवळ संपली आहे, असे जे म्हटले जाते ते  सद्यस्थितीतील चळवळींवर एक दृष्टीक्षेप टाकला की, पटायला लागते. सामाजिक कार्यात झोकून देणा-या, घरावर तुळशीपत्र ठेवून चळीवळीसाठी आयुष्य अपर्ण करणा-
या कार्यकर्ते आताशा शोधूनही सापडणार नाहीत. सत्तर ते एेंशीच्या दशकांमध्ये दलित पँथरने अन्याय, अत्याचाराविरूद्ध जो लढा पुकारला होता, त्यास  तमामचळवळींच्या इतिहासात तोड नाही. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा हा अस्मितेचा लढा बनला. या १७ वर्षांच्या दीर्घ लढ्यात अनेकांचे बळी गेले. अनेकांनी आपल्या आयुष्याची राखरांगोळी करून घेतली. हा लढा केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी नव्हता तर समता आणि अस्मितेसाठीचा होता. दलित पँथर आणि नामांतरचा काळ अनेक चांगल्या वाईट घटनांनी खच्चून भरलेला आहे. अनेक कार्यकत्र्यांनी वादळाशी झुंज घेतली. यातूनच अनेक चळवळी उभ्या राहिल्या, नेतृत्व निर्माण झाले. कवी, साहित्यिक तयार झाले. त्यापैकीच दया हिवराळे एक विद्रोही कवी, चित्रकार आणि निष्ठावंत कार्यकर्ता होते. मातंग समाजात जन्मलेले व बौद्ध धम्म स्वीकारलेले दया हिवराळे यांनी चळवळीसाठी वैचारिक आदर्श घालून दिला. ते पँथरपासून रिपाइंचे कार्यकर्ते होते. त्यांचे नुकतेच मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. तर त्याआधी काही दिवसांपूर्वीच माजी आमदार टी.एम. कांबळे यांचे लातूरमध्ये निधन झाले. दोन पँथर आपल्यातून निघुन गेले. हा आंबेडकरी चळवळीसाठी एक धक्काच आहे. पण नव्या पीढीला त्यांच्या कार्याचा विसर न पडता त्यांच्या चळवळीतील योगदानापासून आदर्श घ्यायला हवा, अशी ही माणसे होती. दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वि.पवार नंतर दुसèया फळीतील कायकर्ते म्हणजे रामदास आठवले, दया हिवराळे, टी.एम. कांबळे, उमाकांत रणधीर, मनोहर अंकुश, गौतम सोनवणे, मराठवाड्यातील प्रीतमकुमार शेगावकर, एस.एम. प्रधान, रामराव गवळी, बाबुराव कदम, रतन पांडागळे यांनी पँथर चळवळ जिवंत ठेवली. दया हिवराळे  यांनी अमरावतीच्या चित्रकला महाविद्यालयातून एटीडीची पदवी घेतली आणि पँथर ते रिपाइं पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ते सन २००२ पर्यंत राहीले. ते रिपाइंचे राज्यसचिवही होते. त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविलेला आहे. शिवाय ते पंधरा वर्षे कलाशिक्षकही होते. शासनाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात प्रबोधनात्मक व्याख्याने दिली. विविध वृत्तपत्रातून क्रांतीप्रवण असे विपूल लेखन केलेले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज,  अण्णा भाऊ साठे , संत कबीर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांना प्रमाण मानून त्यांनी अखंड चळवळ केली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर १९८३ साली मोठे आंदोलन झाले, त्यात दया हिवराळे यांना तुरुंगवास झाला. त्यांना ठाण्याच्या तुरुंगात पंधरा दिवस ठेवण्यात आले होेते. त्यांचा ‘आभारङ्क हा कवितासंग्रह चांगलाच गाजला. दया केवळ कवीच नव्हते तर ते एक सामाजिक मन होते. त्यांनी त्यांच्या कवितांमधून अन्यायाविरूद्धचा विद्रोह मांडला. एवढेच नाही तर नामांतर लढ्यात युद्धातील जवानासारखी झुंज दिलेल्या आणि सध्याच्या काळात अंधारात जीवन व्यतित करणाèया कार्यकत्र्यांचा त्याग, योगदान सगळे काळाच्या उदरात लूप्त होऊ पाहत आहे, त्यामुळे हिवराळे यांनी २००८ मध्ये वर्षभर घर सोडून महाराष्ट्रभर भटकंती करून अनंत अडचणींना सामोरे जात कार्यकत्र्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातूनच ‘नामांतर लढ्यातील लढवय्येङ्क हा ग्रंथ साकारला. नामांतर लढ्यात बौद्धांनी नेतृत्व केले असले तरी यात मातंगासह सर्व  बहुजनांचा सहभाग होता. हे त्यांनी स्पष्ट केले.  इतरांच्या कार्याची दखल घेणाèया दया हिवराळे यांची दखल घ्यावी  आणि नव्या पीढीने त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून सामजिक चळवळीत झोकून दिले पाहिजे यासाठीच हा लेखनप्रपंच.
                                                     
                                            पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

Tuesday, October 22, 2013

स्वाहाकाराला अभय

सध्या राज्यात राजकीय पुढा-यांनी सहकारी साखर कारखान्यांची   केलेली विक्री आणि त्यातील भ्रष्टाचार यावरून वातावरण तापले आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या या व्यवहारात १० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांनी करून अनेक दिग्गजांच्या छातीत धास्ती निर्माण केली. मात्र या आरोपांची काही दिग्गजांनी खिल्ली उडवून आपले कोणीच वाकडे करू शकत नाही, अशी मिजासही दाखविली.  सहकारातील भ्रष्टाचाराच्या मुद्यावर राज्यात असा खल सुरू  असताना  सहकारी संस्था या माहिती अधिकाराच्या कक्षेत येत नाहीत, असा निकाल गेल्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना दिला.
त्यामुळे सहकारी  संस्थांमधील लोकांचा अपवाद वगळता सर्वांच्याच चेह-
यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. कोणत्याही सहकारी संस्थेवर सरकारचे नियंत्रण आणि देखरेख असते, त्यामुळे सहकारी संस्थासुद्धा माहिती अधिकाराच्या कक्षेत आल्या पाहिजेत, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला होता; परंतु या निर्णयाविरोधात काही सहकारी संस्थाचालकांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. त्यांच्या या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला.  एखाद्या संस्थेवर सरकारची देखरेख असेल तर ती सरकारी संस्था होत नाही त्यामुळे सरकारी संस्थांसाठी लागू असलेले नियम अशा ठिकाणी लागू होणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले. त्यामुळे सहकारी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला. परंतु  महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणा-या सहकारी संस्थांना माहिती अधिकाराचा कायदा लागू होत नसल्याने आता सहकारातील भ्रष्टाचाराला एका अर्थाने पाठबळच मिळाले आहे. एखाद्या सहकारी संस्थेत भ्रष्टाचार झाला आहे की नाही, हे आता समजू शकणार नाही. त्यामुळे भ्रष्ट अधिकारी आणि पदाधिका-यांना आपले उखळ पांढरे करून घेण्याची आयतीच संधी मिळणार आहे. पारदर्शकतेसाठी सर्व सहकारी संस्था माहिती अधिकाराच्या कक्षेत असल्या पाहिजेत, अशी रास्त अपेक्षा बुद्धिजीवींकडून व्यक्त केली जात आहे.  माहितीच्या अधिकारामुळे सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येतात ही बाब जनतेच्या हिताच्या दृष्टीने चांगली आहे; परंतु ज्यांना
आपला भ्रष्टाचार उघड होईल अशी भीती असते, त्यांना हा माहितीचा अधिकार म्हणजे साडेसाती वाटतो. मध्यंतरी राजकीय पक्षांनाही हा कायदा लागू व्हावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता; परंतु सरकारने वटहुकूम काढून हा निर्णय रद्दबातल ठरविला आणि राजकीय पक्षांनी निःश्वास टाकला. त्यानंतर शिक्षणसंस्थांनाही माहितीचा अधिकार लागू करण्याबाबत वाद निर्माण झाला होता. त्यासाठी अनेक शिक्षणसम्राटांनी प्रयत्नही केले; परंतु शिक्षणसंस्थांना सरकारचे अनुदान मिळत असल्यामुळे त्या या कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकल्या नाहीत. सहकारी संस्था मात्र या कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत सुटल्या आहेत. त्यामुळे सहकारातील स्वाहाकाराला अभयच मिळाले आहे. काहींच्या मते माहिती अधिकाराचा गैरफायदा घेऊन विविध खात्यांतील अधिकारी-कर्मचा-यांना काही लोक ब्लॅकमेल करीत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र तिथेच धूर निघतो जिथे काही तरी जळत असते. त्याचे मूळही भ्रष्टाचारातच आहे. त्यामुळे माहिती अधिकाराचे शस्त्र जनहितासाठी आवश्यक आहे. सरकारी वा सहकारी संस्था या मुळात जनतेच्या पैशांवरच चालत असतात.त्यामुळे त्यांच्यावर निर्बंध असलेच पाहिजेत.  सहकारातून समृद्धी साधताना काही मूठभर लोकांचीच समृद्धी का होते? महाराष्ट्रातील काही जिल्हा सहकारी बँकांची का वाट लागली ? अनेक सहकारी साखर कारखाने का बंद पडले ? यांची उत्तरे  आरटीआय मुक्तीचे समर्थन करणा-यांकडे आहेत का? त्यामुळे ‘सहकारी संस्था माहिती आधिकाराच्या कक्षेत नाहीत, या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याने हर्षित झालेल्यांनीच नव्हे तर सर्वांनीच याचा गांभीर्याने विचार करण्याची खरी गरज आहे. 

Sunday, October 20, 2013

मतदान पोचपावतीवर चर्चा हवीच

भारतीय संविधानाने जो मतदानाचा अधिकार दिला त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आपला प्रतिनिधी निवडण्याची आणि प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळू लागली,सत्तेच्या माध्यमातून समाजात अमुलाग्र बदल घडविता येतो. त्यामुळेच संवैधानिक हक्कांना महत्त्व आहे. परंतु नागरिकांच्या मतांवर निवडून गेलेले लोकप्रतिनिधी संधीसाधू बनू लागले  आहेत. सत्तेतील पदाचा गैरवापर करून स्वत:च्या तुंबड्या भरून धनदांडगे होऊ लागले आहेत. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा नितीचा वापर नेतेमंडळी करू लागली आहेत. हे चालाख, धूर्त राजकारणी मंडळी मतदानादरम्यान नागरिकांनी केलेल्या मतदानामध्येही घोटाळे करून आपली आमदारकी, खासदारकी कशी अबाधित राहील,याचा प्रयत्न करता
ना दिसतात. पूर्वीच्या बॅलेट पद्धतीच्या जागी मतदान यंत्र आले. मात्र या मतदान यंत्रातही तांत्रिकरित्या घोटाळा करून लोकांची सर्वाधिक मते आपणासच
कशी पडतील याची सोय करीत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतही अनेक ठिकाणी असे प्रकार उघडकीस आले. प्रामुख्याने नांदेडच्या भोकर विधानसभा मतदारसंघात  आणि नाशिकमध्येही असा घोटाळा झाल्याच्या तक्रारी निवडणुक आयोगाकडे करण्यात आल्या होत्या. असा गंभीर प्रकार भोकर विधानसभा मतदारसंघात घडल्याची तक्रार माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. मतदानासाठी जे मतदान यंत्र आणण्यात आले होते, त्या यंत्राचे प्रात्याक्षिक निवडणुक अधिका-यांनी घेतले तेव्हा सात उमेदवारांच्या नावासमोर मतदान यंत्रावरील बटन दाबण्यात आले, तेव्हा असे दिसून आले की, सात पैकी पाच मते  प्रस्थापित पक्षाच्या एकाच उमेदवाराला पडली होती. नंतर निवडणूक अधिका-यांनी यंत्र खराब झाल्याचे कारण पुढे करीत या प्रकारावर पडदा टाकण्यात आला. अर्धापूर मतदारसंघातही मतदान यंत्रात हाच धक्कादायक प्रकार आढळून आला. शिवसेना, भाजपने या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवडणुक आयोगासह राष्ट्रपतींना पत्र लिहिले गेले परंतु पाच वर्षे उलटूनही यावर काहीच कार्यवाही झाली नाही. असाच प्रकार नाशिकमध्येही घडला होता.  तिथे मनसेने तिनही जागांवर विजय मिळविला आणि दिग्गजांचा पराभव झाला. त्यामुळे अकरा उमेदवारांनी स्वत:च्या स्वाक्षरीने मतदान यंत्रात घोटाळा करण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिका-यांकडे केली गेली. पुढे त्याचे काहीच झाले नाही. मतदानयंत्रात हॅqकग आणि सेqटग कशा प्रकारे केली जाऊ शकते, याबाबत हैदराबाचे साफ्टवेअर इंजिनीयर हरिप्रसाद यांनी सप्रयोग सिद्ध करून दाखविले होते. एवढेच नाही तर सॅटेलाईटच्या माध्यमातूनही मतदानायंत्रात आवश्यक ते बदल करता येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. मतदान यंत्र घोटाळ्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेकांनी अपील केले होते. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक आयोगाला आदेश दिले की, प्रत्येक मतदान केंद्रावर यंत्रासोबत qप्रटर जोडून मतदाराने कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले, त्याची पावती देण्याची सोय करावी. तो मतदान कोणाला केले, याचा पुरावा राहील. मतदान यंत्राच्या घोटाळ्याला यातून आळा बसेल, या हेतून सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश दिले. परंतु मतदान पोच पावतीमुळे मतदानादरम्यान देशात अराजकता निर्माण होण्याची शक्यता नाकारत येत नाही. मतदार मतदान करून मतदान केंद्राच्या बाहेर पडल्यानंतर विविध राजकीय पक्षांचे पुढारी मतदारांवर दबाव आणून, मतदान कोणाला केले, असे म्हणून मतदाराकडून मतदानाची पावती जबरदस्तीने पाहू शकतात. यातून वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. मतांसाठी गाव-शहरांमध्ये ज्वारी उचलणे, शपथा घेणे असे प्रकार आधीपासूनच सुरु आहेत. त्यात मतदान पोचपावतीमुळे राजकारण्यांचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे समाजात त्याचे काय दुष्परिणाम होतील, यावर सांगोपांग चर्चा होण्याची खरी गरज आहे.

Tuesday, October 8, 2013

आसारामची ग्रँडमस्ती

एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सध्या जोधपूरच्या तुरुंगात असलेले स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसुमल थाऊमल सिरुमलानी ऊर्फ आसारामबापू आणि त्यांचे पुत्र नारायण साई यांच्या रासलीलांचा,  बुवाबाजीचा भांडाफोड झाला आहे. मात्र त्यांच्या या दुष्कृत्याने संपूर्ण देशाची जगभर बदनामी होत आहे. तेरा वर्षांपूर्वी गुजरात सरकारने भैरावती गावात सत्संगाच्या प्रचारासाठी दहा एकर जमीन दिली आणि तेथूनच आसारामच्या दुष्कृत्याची कर्मकथा खèया अर्थाने सुरू झाली. त्यानंतर आसारामने देशभर फिरून लाखो भक्त निर्माण केले. सत्संगाच्या नावाखाली करोडो रुपयांची माया जमा केली, बेकायदेशीर जमिनी बळकावल्या, त्यावर आश्रम काढले. देशात आणि देशाबाहेर आसारामचे चारशेपेक्षा अधिक आश्रम असून त्याची मालमत्ता एक लाख कोटींच्या घरात आहे. परंतु मागील पाच वर्षांपासून त्यांच्या या गोरखधंद्याला घरघर लागली. आसाराम यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणे, नरबळी देणे, पत्रकारांना धमकावणे, भक्तांची शारीरिक छळणूक करणे, लोकांना गंडवणे, जमिनी हडप करणे, धमकी देणे असे अनेक गुन्हे या तथाकथित  संताने केलेले आहेत. धर्माच्या नावावर आसारामने लूट चालविली होती. ते अल्पवयीन तरुणींचे लैंगिक आणि मानसिक शोषण करीत आलेले आहेत. त्यांच्या या दुष्कृत्यांनी देशातच नव्हे तर जगभर खळबळ उडाली असून धार्मिक श्रद्धाळूंच्या संत, महंतांवरील विश्वासाला मोठा तडा गेला आहे. साधुत्वालाच काळे फासले  गेले आहे.आता गुजरातच्या सुरतमधील दोन बहिणींनी आसाराम आणि त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगी तसेच त्याचा मुलगा नारायण साई  यांच्याविरुद्ध लैंगिक शोषण केल्याचा एफआयआर दाखल केल्याने पुन्हा खळबळ  उडाली. आसारामने मोठ्या बहिणीवर तर नारायण साईने लहान बहिणीवर बलात्कार केला होता. दहा वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र भीतीपोटी याची कोठेही वाच्यता केली नव्हती. या आणखी एका
तक्रारीमुळे आसारामचे कुटुंबच गोत्यात आले. एवढेच नाही तर अहमदाबाद येथील वीणा चौहान यांच्या कुटुंबियावर आसारामने विषप्रयोग करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेतून चौहान यांचे कुटुंबीय बचावले गेले. पाच वर्षांपूर्वी दांभोईमध्ये आसारामच्या आश्रमातील पीडित मुलींना मदत केल्यावरून वीणा चौहान व त्यांच्या कुटुंबीयांना आसारामने पाठविलेल्या तरुणीकडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आसारामने यापूर्वीही अनेक कुकर्म केलेली आहेत. जुलै २००८ मध्ये qछदवाडा येथील त्यांच्या आश्रमातील बाथरूममध्ये बालकाचा मृतदेह आढळून आला होता. भक्तांच्या छळवणुकीचेही अनेक प्रकार उघडकीस  आलेले आहेत. रामाची कथा सांगून रावणाची चाल खेळणारा आसाराम मात्र  त्याच्यावरील आरोपांना आपल्याविरुद्धचे षड्यंत्र असल्याचे सांगत आहे. तर त्यांचे समर्थकही धर्माचा आडपडदा घेऊन, आमच्या परम पूज्य आसाराम बापूंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे, जे काही सिद्ध होईल, ते कोर्टात होईल, असा डांगोरा पिटत आहेत. मग आसाराम यांच्याविरुद्धच्या तक्रारी काय खोट्या आहेत? ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्ङ्क या उक्तीप्रमाणे लाखो लोकांनी आसारामवर विश्वास व्यक्त केला; परंतु आसारामची ही धर्मश्रद्धा नव्हे तर अंधश्रद्धा असल्याचे स्पष्ट होत असल्याने आता लोकांचे डोळे उघडू लागले आहेत. ज्यांच्या ज्यांच्यावर आसारामने अत्याचार केलेला आहे, अशा पीडितांना आसाराम तुरुंगात गेल्याने आत्मबळ मिळाले असून  ते तक्रार करण्यास धजावत आहेत.  आध्यात्मिकतेच्या बुरख्याखालून बुवाबाजीची ग्रँडमस्ती  करणाèया आसाराम  आणि त्यांचा मुलगा नारायण साईला तुरुंगात जीवनभर सडवायला हवे, जेणेकरून त्यानंतर कोणी बुवा, महाराज लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडणार नाहीत qकवा श्रद्धाळू भाविकांचे शोषण करण्यास धजावणार नाहीत. देशातील  अशा इतरही ढोंगी, भोंदू  महाराजांना पायबंद घातला  जावा अन्यथा समाजात अराजकता माजण्यास वेळ लागणार नाही.

Wednesday, October 2, 2013

अस्वस्थ करणारी दिरंगाई

अंधाराच्या सनातनी दुतांनो, तुमच्या तथाकथित अध्यात्मिक शक्तिने
कणभरही मारता आलं नाही नरेंद्र दाभोलकर नावाच्या विचाराला,
अंतिमत: ....पराभूत होऊन तुम्हाला टेकावे लागले गुडघे,..
 म्हणूनच तुम्ही वापरलं इतिहासाच्या ठेवणीतलं ब्रह्मास्त्र,
जे आधी माखलं होतं चार्वाक-तुकारामाच्या रक्तानं...
सचिन माळी नामक तरूणाने ऑर्थर रोड जेलमधून डॉ.नरेंद्र दाभोलकरांवर लिहिलेली ही कविता तमाम सनातन्यांसाठी एक मोठी चपराक आहे. एवढेच नाही तर पुरोगामीपणाचा टेंभा मिरविणाèया आणि तब्बल दीड महिना उलटून गेला तरी दाभोलकरांच्या मारेकèयांचा शोध लावू न शकलेल्या शासनकत्र्यांसाठी आत्मपरिक्षण करायला लावणारे हे स्पदंन आहे. दाभोलकरांचे मारेकरी अद्यापही मोकाटच असल्याने  महाराष्ट्रातील तमाम सुधारणावादी पुरोगामी कार्यकत्र्यांमध्ये अशी प्रचंड अस्वस्थता, एक धुमस् निर्माण झाली आहे. दाभोलकरांच्या हत्येला महिना पूर्ण झाल्यानंतर राज्यातल्या अनेक जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकत्र्यांच्या आणि सहानुभूतीदारांच्या बैठका झाल्या. काही ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले तसेच जिल्हाधिकाèयांना निवदने देऊन दाभोलकरांच्या हत्येची उकल करण्यास दिरंगाई होत असल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. पोलिस आणि शासनकर्ते आपल्या नेहमीच्या शैलीत शोध सुरु आहे, आमचे प्रयत्न सुरु आहेत, आम्ही आरोपींपर्यत पोहचत आहोत, काही माग सुद्धा लागलेला आहे, अशी उत्तरे देत आहेत. महिनाभरात केवळ दोन आरोपीचे स्केच, याच्या पलिकडे पोलिसांचा तपास गेलेला नाही. सीसीटीव्ही कॅमेèयावर हत्येत गुंतलेल्या आरोपींचे पुसटसे चित्रण लंडनच्या फॉरेन्सिक  लॅबोरेटरीकडे पाठविले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.  हे चित्रण महिनाभरापूर्वीच लंडनला का पाठविण्यात आले नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात गुन्ह्यांचा शोध लावण्याच्या पद्धती आणि तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. त्यामुळे कितीही गूढ गुन्हा असला तरी त्याचा शोध लावला जातोच. राज्यातील पोलिस शोध तंत्राचा वापर करण्यास सक्षम नाहीत, असेही नाही, पण दाभोलकर हत्येच्या तपासाबाबत दिरंगाई का ? या दिरंगाईमुळेच समाजात अस्वस्थता आणि अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. दाभोलकरांच्या मारेकèयांचा शोध घेण्यास शासन आणि पोलिसांना अपयश येत असल्यामुळे दाभोलकरांच्या हत्येमागे शासनाशी संबंधित असलेल्या कोणाचा तरी हात आहे की काय, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात दाभोलकरांच्या संदर्भात अशा अनेक शंका कुजबुजल्या जात असून त्या चर्चेतही आल्या आहेत. या सगळ्या शंकांना  एकच उत्तर उपाय ठरू शकतो ते म्हणजे  शासनाने तात्काळ तपास करून मारेकèयांना कठोर शासन करणे. जर राज्य शासन आणि पोलिसांना तपास लावणे शक्य होत नसेल तर ते प्रकरण सीबीआयकडे द्यावे. जेणेकरून दाभोलकरांच्या हत्येचा पर्दाफाश होऊ शकेल.  मारेकèयांनी दाभोलकरांची हत्या करून परराज्यात पोबारा केला असावा, अशी काहींची शंका असल्याने तपास सीबीआयकडेच देणे पर्याप्त ठरू शकेल. दाभोलकरांचा खुनी शोधण्यासाठी इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीचीही मदत घ्यावी, अशी अपेक्षा दाभोलकरांचे चिरंजिव, डॉ.हमीद दाभोलकर यांनी परवा लातूरला आल्यानंतर व्यक्त केली. दाभोलकरांचे कुटुंबही राज्याच्या पोलिस तपासावर विश्वास दर्शवित आहेत आणि पोलिसांना मात्र कसलेच धागेदोरे सापडत नाहीत. याचा अर्थ काय?  जादूटोणा विरोधी कायदा संमत व्हावा, यासाठी  दाभोलकरांचा बळी गेला. तो कायदा संमत व्हावा यासाठी राज्यासह केंद्रातील बड्या नेत्यांकडे पाठपुरावा सुरु आहे. सशक्त लोकशाहीसाठी महाराष्ट्राने खंबीरपणे उभे राहण्याची खरी गरज आहे. नागपूरात होणाèया हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर झाला तर  तीच दाभोलकरांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल.

Saturday, August 10, 2013

मराठीतील पहिला अ‍ॅनिमेशनपट ‘छत्रपती शिवाजी '



लातूरकरांची ऐतिहासिक कलाकृती
.............................................
 लातूरचे चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अझहर खान आणि त्यांच्या टीमने ‘छत्रपती शिवाजीङ्क हा मराठीतील पहिला ऐतिहासिक अ‍ॅनिमेशनपट तयार  केला असून नुकताच हा अ‍ॅनिमेशनपट महाराष्ट्रात सर्वत्र रुपेरी पडद्यावर झळकला आहे. मनोरंजनाबरोबरच बालप्रेक्षकांना छत्रपतींचा इतिहास कळावा, या हेतून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाला बालकांसह पालक, शिक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाबद्दल घेतलेला हा आढावा...
....................................................
 मराठवाडा मागासलेला आहे, म्हणून या भागाला नेहमी हिणविलं जातं. परंतु वेळोवेळी मराठवाड्याने राजकारण, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली गुणवता सिद्ध करून अटकेपार झेंडा फडकावला आहे. विकासाकडे वाटचाल करणारे लातूर शहर तर यामध्ये आघाडीवर आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र लोकप्रिय अभिनेते रितेश देशमुख हे चित्रपटनिर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच  बीपी (बालक-पालक) या  चित्रपटाची निर्मिती केली, त्याला उदंड प्रतिसादही मिळाला. त्यानंतर पेशाने शिक्षक असलेले लातूरचे अझहर खान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर ‘छत्रपती शिवाजी : द एम्परर ऑफ पीपल्स प्राईडङ्क हा अ‍ॅनिमेशनपट तयार करून सिनेजगतात एक वादळ निर्माण केले आहे. मराठीतील हा पहिलाच अ‍ॅनिमेशनपट ठरला आहे. गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्रात केवळ पाच चित्रपट तयार झाले आहेत. ही खूप खर्चिक अशी बाब आहे. त्यामुळे अ‍ॅनिमेशनपट काढण्याचे धाडस सहसा कोणी करीत नाही. मात्र, लातूरकरांनी हे धाडस करून इतिहास घडविला आहे. अझहर खान हे लातूरमध्ये मॉरेल मल्टिपर्पज एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम करतात. त्यांनी आपल्या अमन अनम प्रॉडक्शनद्वारे त्यांच्या संस्थेतील अ‍ॅनिमेशनचे शिक्षक आणि विद्याथ्र्यांच्या कौशल्याचे सहकार्य घेऊन या ऐतिहासिक अ‍ॅनिमेशनपटाची निर्मिती केली. अझहर खान यांनी छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास मांडला आहे. छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. एक आदर्श जाणता राजा म्हणून त्यांची ओळख भारत खंडात आहे. त्यांचा इतिहास आजपर्यंत कथा, कादंबèया आणि इतिहासाच्या पुस्तकातून मांडण्यात आला. काही बोटांवर मोजण्याइतपत चित्रपटही निघाले. मात्र, आतापर्यंत त्यांच्या चरित्रावर अ‍ॅनिमेशनपट कुणी तयार केला नव्हता. अ‍ॅनिमेशन qकवा कार्टून म्हटले की, लहान मुलांना लवकर आकर्षित करणारे माध्यम आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांची शौर्य कथा विद्याथ्र्यांसमोर मांडावी आणि मनोरंजनातून त्यांचे प्रबोधन व्हावे, कारण ज्यांना आपला इतिहास माहित असतो, तेच इतिहास घडवू शकतात, या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केली असून, याचा निश्चितच विद्याथ्र्यांच्या जडणघडणीवर काहीअंशी चांगला परिणाम होईल, यात शंका नाही, असा विश्वास या अ‍ॅनिमेशनपटाचे निर्माते, दिग्दर्शक अजहर खान यांनी दैनिक एकमतशी बोलताना व्यक्त केला.
‘छत्रपती शिवाजीङ्क हा अ‍ॅनिमेशनपट बाल प्रेक्षकांसाठी जेवढा उद्बोधक आहे, तेवढाच मनोरंजक आणि वीररसाने परिपूर्ण असा चित्रपट आहे. मराठीसह qहदी, तामिळी, तेलुगू आणि इंग्रजी अशा पाच भाषांत तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही खान यांचेच आहेत. त्यांना जगमोहन कपूर, कार्तिकेय तिवारी आनंदqसग आदी नामवंत तज्ज्ञांनी सहकार्य केले आहे. या चित्रपटाला राम गौतम व कार्तिकेय तिवारी यांनी अप्रतिम असे संगीत दिले आहे. चित्रपटात सहा गाणी असून सुप्रसिद्ध गायक कैलास खेर, अमेय दाते, संजीवनी, जावेद अली, साधना सरगम आणि मधुश्री यांनी गायिली आहेत. त्यांच्या या गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. या चित्रपटाची पूर्णपणे डिजीटल टेक्नॉलॉजी आहे. या अ‍ॅनिमेशनपटाची रेंडरिंग जर्मनीहून करून आणली आहे. अतिशय महागड्या तंत्रज्ञांनाचा वापर करून चित्रपट आकर्षक आणि प्रभावी तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी राज्यात प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी शासनाने हा चित्रपट टॅक्स फ्री केला. त्यामुळे  या चित्रपटाने गेल्या आठवड्यात ९६ टक्के व्यवसाय मिळविला आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो, असेही खान यांनी सांगितले. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लातूरमध्ये पीव्हीआर आणि बिग सिनेमा या थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी झुंबड उडालेली दिसून येत आहे. पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियातील सिडनी, मेलबर्न या प्रमुख शहरांतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 या चित्रपटाच्या निर्मितीचे मोठे आव्हान होते. तथापि, लातूरकरांवर अपार प्रेम करून सर्वांनाच प्रोत्साहन देणारे आमचे प्रेरणास्थान माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी प्रारंभी मदतीचा हात आणि प्रेरणा दिल्याने चार वर्षांच्या अथक परिश्रमातून हे कार्य पूर्ण केले. या ऐतिहासिक कार्यामागे साहेबांचीच खरी प्रेरणा आहे. त्यामुळे हा अ‍ॅनिमेशनपट त्यांनाच समर्पित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
   यात शिवरायांच्या जन्मापूर्वीचा काळ, सामाजिक, भौगोलिक परिस्थिती, शिवरायांचा जन्म, बालपण ते शिवराज्याभिषेक असे प्रसंग घेतले असून, यामध्ये एकूण वेगवेगळे ५६ प्रसंग चितारले आहेत. यामध्ये सलग ११ लाख चित्र आहेत. चित्रपटातील रिमिक्सही खरोखरच अफलातून  आहे.
या चित्रपटाची कथा लिहिताना कोणताही वाद ओढवून घेतलेला नाही. शासनाला जो छत्रपती शिवरायांचा इतिहास मान्य आहे, तोच इतिहास चितारण्यात आला आहे. शिवरायांचे कृषी धोरण, सीमा सुरक्षा, समुद्रीतट असे विविध विषयही हाताळले आहेत. अ‍ॅनिमेशन हे बालमनोरंजनाचे उत्तम साधन असल्याने  आणि मुले शौर्यप्रिय असल्याने त्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास कळावा, हा या चित्रपटाचा हेतू असल्याचा पुनरुच्चार अझहर खान यांनी केला. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर द मॅन ऑफ सेंच्युरी या नावाने अ‍ॅनिमेशनपट तयार करण्यात येणार आहे. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत हा अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित होईल. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याचा संकल्प असल्याचे निर्माता-दिग्दर्शक अजहर खान यांनी सांगितले.
बॉक्स..............
  या अ‍ॅनिमेशनपटाची वैशिष्टये
 *छत्रपती शिवाजी महाराजांवरील जगातला पहिला अ‍ॅनिमेशनपट.
* विद्याथ्र्यांनी विद्याथ्र्यांसाठी तयार करण्यात आलेला पहिलाच चित्रपट.
*लातूरसारख्या ग्रामीण भागातील शिक्षक, विद्याथ्र्यांची अ‍ॅनिमेशन तंत्रज्ञानामध्ये गरुडझेप.
*मराठीतील सर्वांत बिग बजेट चित्रपट.
*१३ चित्रपट चॅनलनी कव्हरस्टोरी बनविली.
*एकूण पाच भाषा मराठी, तेलुगू, इंग्रजी, तामिळ आणि qहदी भाषातून एकाचवेळी प्रदर्शित होणारा चित्रपट.
 लोकनेते विलासराव देशमुख यांना समर्पित !
छत्रपती शिवरायांप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख  साहेबांनीही महाराष्ट्रात एक आदर्श राज्य करून दाखविले. ‘छत्रपती शिवाजीङ्क या अ‍ॅनिमेशनपटाला साहेबांचीच खरी प्रेरणा आहे. साहेबांनीच प्रोत्साहन आणि मदतीचा हात दिला म्हणूनच या चित्रपटाचा प्रकल्प पूर्ण होऊ  शकला. साहेबांच्याच हस्ते या चित्रपटातील गाणी १९ फेब्रुवारी २०११ रोजी लॉन्चिग करण्यात आली. साहेबांच्याच संस्कारात वाढलो, मोठा झालो. वडिलांनी मला जन्म दिला आणि साहेबांनी मोठे केले. त्यामुळे हा अ‍ॅनिमेशनपट साहेबांनाच समर्पित केला आहे. शिवाय या चित्रपटासाठी आमदार अमित देशमुख आणि सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनीही वेळोवेळी हातभार लावला. त्यांचेही आभार मानतो, असे निर्माता-दिग्दर्शक अझहर खान यांनी भावूकपणे सांगितले.
लातूरकरांची भरारी सातासमुद्रापार...
शिवरायांवरील अ‍ॅनिमेशनपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्येही प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या माध्यमातून लातूरकरांनी सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. त्यातच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर द मॅन ऑफ सेंच्युरी या नावाने अ‍ॅनिमेशनपट तयार करण्यात येणार आहे. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत हा अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित होईल. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याचा संकल्प असल्याचेही निर्माता-दिग्दर्शक अजहर खान यांनी सांगितले. या माध्यमातूनही ते मोठी झेप घेऊ शकतात.
रितेश देशमुख यांच्या हस्ते प्रोमोचा शुभारंभ
६ जानेवारी २०१३ रोजी मुंबई येथे ‘छत्रपती शिवाजीङ्क या अ‍ॅनिमेशनपटाचा प्रोमो सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. यावेळी चित्रपटाचे पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी रितेश देशमुख यांनी लातूरचे दिग्दर्शक, निर्मात्यासह सर्व कलावंताचे कौतुक करून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. निर्माता अझहर खान व त्यांच्या संपूर्ण टीमने त्यांचे आभार मानले.
अ‍ॅनिमेशनची ‘एबीसीडीङ्क माहित नसलेला दिग्दर्शक
‘छत्रपती शिवाजीङ्क या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे अझहर खान हे जरी महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ  फॅशन अ‍ॅण्ड इंटेरिअर आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य असले तरी त्यांना चार वर्षांपूर्वी अ‍ॅनिमेशनची साधी एबीसीडी सुद्धा माहित नव्हती. परंतु त्यांनी आपल्या महाविद्यालयातील अ‍ॅनिमेशनच्या शिक्षकांकडून ते कौशल्य अवगत करून घेतले. आपण तज्ज्ञ नसलो तर त्याबाबत जाणकार मात्र आहोत, असे ते सांगतात.
चित्रपटाची रेंडरिंग जर्मनीत
 या अ‍ॅनिमेशनपटाची रेंडरिंग ही जर्मनीतून करून आणली आहे. कारण अ‍ॅनिमेशनपटाची रेंडरिंग म्हणजे जे चित्र असतात, त्यांना उत्कृष्टरित्या पॉलिश करण्याचे तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान भारतात केवळ मुंबईत आणि त्यानंतर स्वित्झर्र्लंंड आणि जर्मनीत उपलब्ध आहे. आपल्या देशात ही प्रक्रिया खूप महाग असल्याने चित्रपटाची रेंडरिंग जर्मनीतून करण्यात आली आहे.
अशी सूचली चित्रपट कथा
 अझहर खान यांच्या शिक्षण संस्थेतील अ‍ॅनिमेशन अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाèया शिक्षकांनी घोडे आणि हत्तीचे जिवंत चित्र संगणकाच्या स्क्रीनवर तयार केले आणि या चित्रातूनच अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याची प्रेरणा घेऊन लातूरकर असलेल्या निर्माता, दिग्दर्शक अजहर खान यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याचा निश्चय केला आणि चार वर्षांत त्यांनी हा आव्हानात्मक प्रकल्प पूर्ण करून अ‍ॅनिमेशनपटातून शिवरायांचे चरित्र मांडले.
                     
                                                      -  संपादन : शिवाजी कांबळे,मोबा ९०११३०८५८०

माक्र्स आणि आंबेडकरवादाचे ‘फ्युजन'


..............................................................
 लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या उभ्या आयुष्यात जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा यांच्या सीमा तोडून दीन-दलितांसाठी त्यांनी आपली लेखणी झिजविली. दलित, पीडित, शोषित, बहिष्कृत, तिरस्कृत, कष्टकरी बहुजन समाजाच्या गुलामीचे, बंडाचे, जगण्याचे चित्रण अफलातून निर्माण केले. आज त्यांची जयंती. त्यांची जयंती कर्मकांड ठरू नये म्हणून त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हीच अण्णा भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल.
..........................................................
लोकशाहीर, साहित्यरत्न क्रांतिवीर  तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला एक लोकशाहीर, कथा-कादंबरीकार म्हणून परिचित असले तरी ते क्रांतिकारी विचारवंत, राष्ट्रनिर्माते होते.  मानवमुक्तीच्या लढ्यासाठी समाजपरिवर्तनाचे उत्तुंग कार्य करणाèया अण्णा भाऊंची मात्र जिवंतपणी आणि निर्वाणानंतरही उपेक्षा झाली असली तरी त्यांच्या विचारांची धग आजही समाजमनात कायम आहे पण आज आम्ही महापुरुषांची वाटणी करून घेतली असून त्यांच्या नावाखाली निरर्थक वाद निर्माण करून चळवळीचे तीनतेरा करीत आहोत. एकमेकांपासून दूर जात आहोत. तो मांग आहे, तो महार आहे, मातंग समाजातील अण्णा भाऊंचे समर्थक म्हणवून घेणारे आंबेकरवाद्यांना प्रतिस्पर्धी म्हणून पाहतात तर काही आंबेडकरवादी मातंगांना हीन लेखतात. एवढेच नाही तर बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदारांमध्येही काही अंशी अशीच स्थिती आहे. त्यामुळेच परिवर्तनवादी बहुजनांच्या चळवळींची वाताहत झाली. आताशा तर पावसाळ्यातल्या छत्र्याप्रमाणे चळवळ गटा-गटांत विखुरलेली दिसून येत आहे.  काही ना-लायक नेत्यांनी जाती-पोटजातीचे सुरू केलेले राजकारण, समाजकारणच त्याला कारणीभूत आहे. तथागत गौतम बुद्ध, समतावादी लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची गुंफण एक आहे हे अद्यापही समाजमनात रुजलेच नाही.
      या थोर महापुरुषांना जातीच्या चौकटीत बसवून त्यांना संकुचित करणे  हे वैचारिक दारिद््रय नाही तर काय? व्यक्तिपूजक बनण्यापेक्षा या महापुरुषांचे विचार आचरणात आणणे ही खरी काळाची गरज आहे. अण्णा भाऊ कम्युनिस्ट होते की आंबेडकरवादी होते, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र चर्चा करणाèयांनी कितीही चर्चा केली तर ती निरर्थकच ठरेल यात शंका नाही. कारण अण्णा भाऊ माक्र्स आणि आंबेडकरवादाचे एक रसायन होते  हेच  चर्चेअंती स्पष्ट होईल.परवा नामवंत आंबेडकरी विचारवंत आणि नाटककार दत्ता भगत यांनी एका वृत्तपत्रातील लेखात आपणास माक्र्सबद्दल अपार आदर असल्याचे नमूद करीत माक्र्सवादाला विरोध करणाèया पोथीनिष्ठ आंबेडकरवाद्यांचा समाचार घेतला. भांडवलशाही व्यवस्थेने निर्माण केलेल्या गुलामीविरोधात माक्र्सचे विचार होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यांसमोर भारतातल्या जातिव्यवस्थेने निर्माण केलेल्या गुलामीचे स्वरूप होते. अण्णा भाऊ  कम्युनिस्ट होतेच पण ते आंबेडकरवादी होते हे त्यांच्या साहित्यातून प्रकर्षाने जाणवते. कारण देशाच्या अधोगतीस जात हीच संकल्पना कारणीभूत आहे. जातीच्या गुलामगिरीतून बाहेर पडल्याखेरीज सामान्य लोकांची प्रगती होणार नाही.
    अण्णा भाऊंनी या जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला. जात, वर्ण, भेद यांच्या सीमा त्यांनी नाकारल्या.  अण्णा भाऊंनी शाहिरी, कथा-कादंबरी, तमाशाला  प्रतिष्ठा मिळवून दिली. याच कलांच्या माध्यमातून त्यांनी कष्टकरी जनतेत अन्याय-
अत्याचारांविरुद्ध जागृती आणली. सामाजिक न्यायासाठी ते आयुष्यभर झगडले. आपल्या साहित्यातून सत्याला महत्त्व दिले. अण्णा भाऊंनी क्रांतिqसह नाना पाटील यांचे रेठरे (बु.) च्या जत्रेतील तमाशाच्या फडात भाषण ऐकले. तेव्हा अण्णा भाऊ हे त्यांचे मावसभाऊ बापू साठे यांच्या तमाशा फडात काम करीत होते. तेव्हापासून अण्णा भाऊंना स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याची प्रेरणा मिळाली. अण्णा भाऊंचे कुटुंब सांगलीहून मुंबईला आले आणि अण्णा भाऊ कम्युनिस्ट चळवळीशी जोडले गेले. या काळात त्यांची वैचारिक जडणघडण झाली.  तद्नंतर ‘चले जावङ्क चळवळीत ते सहभागी असल्याने त्यांच्याविरुद्ध वॉरंट निघाले आणि  अण्णा भाऊंना कायमचे घर सोडावे लागले. त्यानंतर अण्णांनी मुंबई गाठली आणि ते कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. पक्षाच्या प्रचारासाठी १९४४ मध्ये त्यांनी ‘लाल बावटाङ्क  कलापथकाची स्थापना केली. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी शाहीर अमर शेख, शाहीर द. ना. गव्हाणकर होते. अण्णांचे लिखाण  मात्र अखंडपणे सुरूच होते. दरम्यानच्या काळात ते रशियाचा दौराही करून आले. अण्णा भाऊंचा लढा सर्वांना माहीत असलाच पाहिजे आणि हे गृहीतच आहे. अण्णा भाऊंची जयंती कर्मकांड ठरू नये. अण्णा भाऊंची समतावादी, मानवतावादी चळवळ पुढे नेण्यासाठी आपणांस अण्णा भाऊ थांबले त्यापुढचे पाऊल टाकायचे आहे. हा दृढ निर्धार अण्णा भाऊ आणि बाबासाहेबांच्या समर्थकांनी करण्याची खरी वेळ आहे. अण्णा भाऊ  साठे यांच्या जयंती- निमित्त त्यांना त्रिवार अभिवादन !!!
             
                                                                                          -शिवाजी कांबळे
                                                                                                 ९०११३०८५८०

Tuesday, July 16, 2013

दहावीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात चुकांची सेन्चुरी !


                                              शिक्षण मंडळाच्या भोंगळ कारभाराचा कळस
                                                                 शिवाजी कांबळे
लातूर :  राज्य शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळनिर्मित शालेय अभ्यासक्रमांच्या अनेक पुस्तकातील गंभीर चुका यावर्षी चव्हाट्यावर आल्या आहेत. आता दहावी वर्गाच्या बदललेल्या अभ्यासक्रमातील इंग्रजी तृतीय भाषेच्या पाठ्यपुस्तकात शेकडो गंभीर चुका आढळून आल्या असून याचा थेट परिणाम विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक दर्जावर होत आहे.
त्यामुळे अशा चुकांना जबाबदार असणाèया दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे. 
    गेल्या काही दिवसांत पाठ्यपुस्तकांमधील काही चुकांवरून वादळ उठले आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाला इतिहास, भूगोलची मंडळे बरखास्त करावी लागली. नवव्या वर्गाच्या qहदीच्या पुस्तकातही अक्षम्य चुका समोर आल्या. आता २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून दहावी वर्गाच्या अभ्यासक्रमात लागू करण्यात आलेल्या  'English Reader A Coursebook in English (Standard X) ' या पाठ्यपुस्तकात १०१ चुका आढळून आल्या आहेत. शिक्षण मंडळातील तज्ज्ञ लेखक, शिक्षकांकडून छाननी, पुनर्विलोकन करून हे पुस्तक निर्दोष झाल्याचा दावा पुस्तकाच्या प्रस्तावनेत केलेला आहे. मात्र प्रत्यक्षात या पुस्तकात गंभीर चुकांचा समावेश आहे.  अगदी ऋणनिर्देशात पृष्ठ क्र. ४ पासून ते शेवटचे पृष्ठ क्र. २०६ पर्यंत शब्दांचे स्पेलिंग (वर्णरचना), विरामचिन्हे, शब्दकोडे, पुनरावृत्ती, व्याकरण व अस्थानी छपाईत विविध प्रकारच्या शंभरावर चुका आहेत. प्रामुख्याने पृष्ठ क्र.४ वर Acknowledgement  मधील तिस-या परिच्छेदातील शेवटच्या ओळीतीर्ल  subsequent या शब्दातील"b' हे अक्षर गायब आहे. पृष्ठ क्र. १० वरApproach , Method and Techniques या शीर्षकाखालील सहाव्या ओळीच्या परिच्छेदात एकूण चार चुका आहेत. त्यात Maharashtra State या दोन शब्दांमध्ये ऑब्लिक (/) या चिन्हाची गरज नसताना टाकण्यात आले आहे. नियमानुसार साधा वर्तमानकाळाच्या वाक्यातील कर्ता एकवचनी व तृतीयपुरुषी असेल तरच त्यापुढे येणा-या  मुख्य क्रियापदास  "s ' प्रत्यय लागतो. मात्र येथे Underscores  असे छापण्यात आले आहे. पान क्र. ९ वर Approach , Method  या शीर्षकाखालील सहाव्या ओळीत practise  ऐवजी practice असे चुकीचे स्पेqलग छापले आहे. पान क्र. ५ वरA 8 Part II Q. 1 मध्ये  Result ऐवजी Reason असा चुकीचा शब्द छापण्यात आला आहे. पान क्र. १४ वरही अशीच चुक आहे.Traveller  ऐवजी  Traveler  अशी स्पेqलगमध्ये चुक आहे. पान क्र. ३० वर chidiya ऐवजी chidya, पान क्र. ३३ वर made  ऐवजी mad असे छापले आहे. अशा अनेक प्रकारच्या चुका या पुस्तकात आहेत. या चुकांच्या गोंधळामुळे विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक दर्जावर विपरित परिणाम होत असून शिक्षण खात्याने तात्काळ या चुकांची दखल घेऊन चुकांसाठी दोषींवर कारवाई करावी आणि  दुरुस्तीची उपाययोजना करावी किंवा पुस्तक बदलून द्यावे, अशी मागणी सुजाण पालक व शिक्षणप्रेमी जनतेतून केली जात आहे. 
बॉक्स..............
माजी गटशिक्षणाधिका-यांनी केली चुकांची यादी
३५ वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापनाचे कार्य करून सेवानिवृत्त झालेले आणि देवणीचे माजी गटशिक्षणाधिकारी माणिक वाघमारे यांनी या दहावीच्या इंग्रजी पुस्तकातील चुका शोधून काढल्या आहेत. एवढेच नाही तर त्यांनी १०१ चुकांची यादीच तयार केली असून अपेक्षित दुरुस्त्याही सूचविल्या आहेत. ‘माझ्या ३५ वर्षांच्या इंग्रजी अध्यापन कारकिर्दीत कोणत्याच क्रमिक पुस्तकात एवढ्या चुका आढळून आलेल्या नाहीत.ङ्क असे त्यांनी म्हटले आहे.  

Saturday, July 6, 2013

मस्ती, मजा आणि धमाल म्हणजे ‘फेकमफाक' : भरत जाधव



......................................
 एमईएफएसी प्रॉडक्शन्स निर्मिती संस्थेचा पहिलाच चित्रपट ‘फेकमफाक' हा १२ जुलैला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार  अभिनेता भरत जाधव हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्या निमित्ताने दै. एकमतशी त्याने या चित्रपटाबद्दल आणि इतरही विषयावर  दूरध्वनीवरुन मनमोकळ्या गप्पा मारल्या.   ‘फेकमफाकङ्क चित्रपट हा मस्ती, मजा आणि धमाल करणाèया थापाड्याची एक कहाणी असून ती लोकांनी आवर्जून पाहावी आणि आनंद घ्यावा, असे त्याने आवर्जून सांगितले.
......................................................................
प्रश्न : ‘फेकमफाकङ्क चित्रपटाबद्दल सांगा,  आपण या चित्रपटात कोणती भूमिका साकारली आहे?
 - दयानंद राजन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. मी, ऋचिता जाधव, विजय चव्हाण, विजू खोटे आणि इतर अनेक कलाकार या चित्रपटात आहेत. सस्पेन्स कॉमेडी थ्रिलर असा चित्रपट असून   माझी भूमिका गोपीनाथ देसाई नामक मस्ती, मजा आणि धमाल करणाèया हाका मारत वस्तू विक्रेत्याची आहे. तो सतत थापा मारत असतो, त्यातून लोकांचे मनोरंजन करतो. पुढे त्याची एक थाप खरी ठरते आणि त्यातून सस्पेन्स थ्रिलर निर्माण होते. तेथूनच चित्रपट नवे वळण घेतो.
प्रश्न : या चित्रपटात तुमच्या कॅरेक्टरमध्ये
 नेहमीपेक्षा काही वेगळेपण आहे ?
- वेगळेपण आहे म्हणून चित्रपट बघायला लोक येत नाहीत. निखळ मनोरंजन हाच त्याचा उद्देश असतो. माझ्या भूमिकेत गरजेप्रमाणे वेगळेपण असतेच. भूमिकेशी समरसता महत्त्वाची आहे.
प्रश्न : कोणत्या वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट खेचून आणेल असे तुम्हाला वाटते ?
-  सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी एकत्र बसून बघायला हरकत नाही. शहरात फिरुन हाका मारीत विविध वस्तू विक्री करणारे हा चित्रपट एॅन्जॉय करतील.
प्रश्न : कोणत्या प्रकारचे चित्रपट करायला तुम्हाल आवडतात ?  
- सगळ्या प्रकारचे चित्रपट करायला आवडतात.
प्रश्न : हिन्दी चित्रपटात काम करण्याचा विचार केला नाही का?
- थोड्याच दिवसांत न्यूज कळेल. तोपर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.
प्रश्न :  मराठी चित्रपटाचा चेह
रा बदलला आहे काय?  काय वाटते?
- निश्चितच ! प्रेक्षक मराठी मराठी चित्रपटाची दखल घेत आहेत. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. मराठी चित्रपट जगभर पोहचत आहेत. तुम्हाला काय वाटते, तेच माझेही मत आहे.
प्रश्न : ‘कुणी घर देता का घरङ्क नंतर ‘फेकमफाक' बद्दल   काय अपेक्षा आहेत?
-  कुठलाही चित्रपट चालला पाहिजे.लोकांनी हा चित्रपट पाहावा, अशीच अपेक्षा आहे. हा चित्रपटातील विनोदी पात्रांमुळे प्रेक्षक खळखळून हसतील.शिवाय रहस्य आणि थ्रिलरमुळे त्यांना धक्के ही बसतील. या चित्रपटात चार गाणी असून सध्या गाजत असलेले अ‍ॅटम साँग वैशाली सामंतने गायिले आहे. तर अन्य गाणी साधना सरगम आणि शान यांनी गायिली आहेत. तर भरत बलवली हे उमदे संगीतकार आहेत.

                                                                       -  शिवाजी कांबळे                                                              
       ९०११३०८५८०

संगीत क्षेत्रातला ‘एकलव्य'


 जी माणसे विविध क्षेत्रात मोठी झाली. ज्यांनी स्वत:चे एक अढळ स्थान निर्माण केले. ती बहुतांश माणसं मूळची खरी ग्रामीण भागातलीच. पण काही माणसं स्टार झाली की गावच्या मातीला विसरतात. तर काहींना त्यांची जाण असते.  सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव म्हणतात ना, मातीत जगावं, मातीत मरावं, बाळा, माती लई थोर तिला कसं विसरावं?     तसंच सोलापूर जिल्ह्यातला बार्शी तालुक्यातील उपळा दुमाला या लहानशा गावचा लक्ष्मण अंकुश नाईकवाडी हा युवक आज संगीत क्षेत्रात आपल्या ‘ हर पल तेराही नशाङ्क, मनवारा, तुझ्याविना या आठ गाण्यांच्या तीन अल्बमने उजेडात आला आला आहे. खेड्या राहून शेतातली सर्व कामे करुन त्यानं संगीत क्षेत्रात भरारी घेतली आहे. मुंबई-पुण्याच्या मोठ मोठ्या संगीतकार आणि गीतकारांनी त्याची दखल घेतली आहे. ग्रामीण मातीशी नांत सांगणारा कवी, गीतकार आणि संगीतकार त्याच्या रुपाने उदयास येत आहे. तो संघर्ष करतो आहे, शिकतो आहे, जीवनात यशस्वी होण्यासाठी. म्हणून  कुणब्याची मुलं आता कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता लढायला शिकत आहेत. प्रतिकुल परिस्थितीत लक्ष्मणने बार्शीच्या शिवाजी कॉलेजात बारावी पर्यंतचे कसेबसे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने सांगली येथे इंजिनिअरींगचे दोन वर्षे शिक्षण घेतलं पण ते अपुरेच राहीले. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तो आपले शिक्षण पूर्ण करु शकला नाही. पण मनाने न खचता त्याने गावाकडची कोरडवाहू दहा एकर शेती सांभाळली. शेतीत घाम गाळून आपल्या गीत-संगीताचा छंद जोपासू लागला. खेड्यात रेडिओशिवाय कोणतं साधन नव्हतं. तो रेडिओवर विविध गाणी ऐकायचा. यातूनच तो संगीताच्या प्रेमात पडला. तो स्वत: गाणी लिहितो, कंपोज करतो आणि गातोही. सुरुवातीला त्यानं लातूरच्या एका छोट्याशा स्टुडिओमध्ये ‘तुझ्याविना...ङ्क नावाचा गाण्याचा अल्बम रेकॉर्ड केला. तो २००५ मध्ये मुंबई आकाशवाणीवरुन प्रसारित झाला. तेव्हा लक्ष्मणला आकाश ठेंगणे झाले होते. त्यानंतर ‘ मनवाराङ्क हा  अल्बम २०११ मध्ये फाउंटेन म्युझिक कंपनीने प्रसारित केला. त्यापूर्वी २००८ -०९ मध्ये तयार केलेला ‘हर पल तेराही नशाङ्क हा हिंदी गाण्यांचा अल्बम तब्बल चार वर्षांनंतर रसिकांच्या सेवेत सादर झाला. हा अल्बम ऑनलाईन   प्रकाशित झाला आहे. या तिनही अल्बमची रॉयल्टी अजून त्याला मिळालेली नाही. पण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘तुझ्या प्रवासात...ङ्क हा आणखी एक गाण्यांचा अल्बम लवकरच येणार आहे. मात्र आयुष्यात एखाद्या आव्हानात्मक कामात कोणाच्या आधाराची गरज असते,पण कुणाचाही आधार नसल्याची खंत लक्ष्मणने व्यक्त केली. मात्र संगीतकार मिqलद इंगळे यांनी आपणास खूप मदत  केली, गाण्यांसाठी मार्गदर्शन केले. शिवाय निखिल विनय, लेस्ली या मान्यवरांनी आपणास खूप मदत केल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या तरुणांनी मनापासून जे आवडते त्यामध्येच करिअर करावे, त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश हमखास मिळू शकते. अशी लक्ष्मणची धारणा आहे.
लक्ष्मण नाईकवाडी शेवटी म्हणतो...
 ‘सोबती होती खरी होती
 का तिला नाकारले मी
नेम का तेव्हा कुणाचा हात मी
शोधित होतो.ङ्क

                                                                        -शिवाजी कांबळे                                                                  
                                                                           ९०११३०८५८०

Saturday, June 8, 2013

‘ नालंदा ' चे पुनरुज्जीवन !


........................................................
इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत ज्ञानदान आणि ज्ञाननिर्मितीचे कार्य करीत असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जगातील पहिले आणि सर्वात मोठे ‘नालंदाङ्क विद्यापीठ  परत उजेडात येत आहे. कारण या ऐतिहासिक विद्याठाची पुनस्र्थापना हा तमाम पूर्व अशियायी देशांच्या चर्चेचा विषय बनला आहे. भारतातील गतकाळातील ज्ञानवैभवाला नवजीवन मिळावे, या हेतूने माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी परराष्ट्र मंत्री तथा विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची नालंदा विद्यापीठाच्या पुनस्र्थापनेची कल्पना मूर्त रुप घेत आहे.नोबेल पारितोषिक विजेते अर्मत्य सेन आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली या विद्यापीठाला नवाजन्म देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे केवळ ग्रंथ जाळल्याने ज्ञानाचे पलिते कायमचे विझत नाहीत, हा संदेश नवे नालंदा अनेक शतके जगाला देत राहील...
..................................................
भारताची शैक्षणिक परंपरा एकेकाळी  मोठी वैभवशाली होती. तब्बल आठराशे वर्षांपर्यंत भारतीय विद्यापीठांचा जगाच्या शिक्षण पद्धतीवर मोठा प्रभाव होता. याला इतिहास साक्षी आहे. नालंदा,तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, सोमपुरा आणि उदांतपुरी अशी जगविख्यात विद्यापीठे होती. या विद्यापीठांमधून ज्ञानार्जनाबरोबरच संशोधनाचे कार्य होत असे. अनेक देशातून लोक ज्ञानार्जनासाठी या विद्यापीठांत येत असत. मात्र आजमितीला देशातील उच्च शिक्षणाला उतरती कळा लागली आहे. जगाच्या सर्वोच्च दोनशे विद्यापीठांच्या यादीत तर भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही, ही बाब भारतीयांची मान शरमेने खाली जाण्यासारखी आहे. एवढेच नाही तर उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवतेचे  आजचे चित्र धुसर आणि दिवाळखोरीचे दिसत आहे. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अमुलाग्र असा बदल करण्याची खरी गरज आहे.
 उच्च शिक्षणातील मागासलेपणाबद्दल नुकतेच आपल्या देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही शिक्षणाच्या दुरावस्थेबद्दल खंत व्यक्त केली. परंतु त्यांच्या आणि माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून बिहारमधील प्राचीन आंतरराष्ट्रीय नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरु आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि नोबेल पारितोषिक विजेते अर्मत्य सेन यांच्या नेतृत्वाखाली   समिती हे विद्यापीठ उभारणीचे काम करुन नवा इतिहास घडविण्यासाठी सरसावली आहे.  ही एक तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. नव्या नालंदा विद्यापीठाचे वास्तुचित्र आणि आराखडा तयार करण्यात येत आहे. एकेकाळी जगातील सर्वात मोठे पहिले विद्यापीठ म्हणून नावलौकिक असलेल्या या विद्यापीठात चौथ्या इसवी सनाच्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत या विद्यापीठात अखंडपणे ज्ञानार्जन आणि संशोधनाचे कार्य सुरु होते. या काळात हे विद्यापीठ विद्यार्थी आणि अध्यापकांनी गजबजलेले होते. बौद्ध धम्माचे आणि इतर धर्मिय देशोदशीचे  विद्यार्थी विविध विषयांचा विविध भाषांमधून अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी येऊन आपल्या ज्ञानाची भूक भागवित. या विद्यापीठाद्वारे  चीन, जपान व्हिएतनाम, थायलंडस, दक्षिण कोरियासह आशिया खंडाच्या अनेक देशात बौद्ध धम्माचा प्रसार झाला. या विद्यापीठात दहा हजाराहुन अधिक विद्यार्थी आणि दोन हजार अध्यापक ज्ञानार्जन  आणि ज्ञानदानाचे काम करत. साहित्य, तर्कशास्त्र, चिकित्साशास्त्र, अंकगणित, दंडनीती, ज्योतिषशास्त्र, योगविद्या, व्याकरण, चित्रकला, शिल्पकला, वेदविद्या शिवाय बौद्ध आणि जैन संप्रदायांची शिकवण इथे दिली जायची. रत्नसागर, रत्नोदय आणि रत्नरंजक अशा तीन अलिशान इमारतीमध्ये ग्रंथालय होते. हे ग्रंथालय नऊ मजल्यांचे होते. त्यामध्ये ३ लाखांपेक्षाही अधिक ग्रंथसंग्रह होता.  हे विद्यापीठ म्हणजे उत्कृष्ट स्थापत्य कलेचा अद्भूत नमूना होते. आवारात अनेक स्तूप आणि बुद्ध विहार होते. या विहारांमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या सुंदर मूर्ती होत्या. रत्नांनी चमचमणारी दालने होती. तीनशे खोल्या होत्या, त्यामध्येच व्याख्याने व्हायची. उत्तुंग इमारती आणि आंब्यांची झाडे होती. कनोजचा राज हर्षवर्धन आणि पाल राजाचा राजाश्रय या विद्यापीठाला मिळाला होता. दान मिळालेल्या शंभर खेड्यांच्या उत्त्पन्नातून आणि राजाश्रयातून विद्यापीठाचा खर्च चालायचा. येथील विद्याथ्र्यांना निवासाबरोबरच भोजन, कपडे, औषधोपचार असे सारे काही विनामूल्य मिळत असे. इथले विद्यार्थी होतकरु, ज्ञानपिपासू तर शिक्षक बुद्धिमान, अभ्यासू आणि चारित्र्य संपन्न होते. न्यायशास्त्र ही नालंदा विद्यापीठाने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. जगभरात ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाची श्रेष्ठ अशी परंपरा निर्माण करण्यात नालंदाचे मोठे योगदान आहे. भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध या महापुरुषांनी नालंदा विद्यापीठाला अनेकदा भेटी दिल्याचा इतिहास पाली भाषेतील नोंदीत सापडलेला आहे. चीनी प्रवासी ह्युएन त्संग (इ.स.६११ ते ६४४)  नालंदात ज्ञानार्जनासाठी आले होते, त्यांनी काहीवर्षे या विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले. नालंदाच्या शिक्षण पद्धतीवर त्यांनी विपूल लेखन केले. त्यांनी लिहून ठेवलेल्या ‘जर्नी टू द वेस्ट‘ या इंग्रजी गं्रथात नालंदाबद्दल सविस्तर माहिती मिळते. तसेचतारनाथाने लिहिलेल्या बौदध धम्माच्या इतिहासातही नालंदाचा उल्लेख सापडतो.   नालंदा विद्यापीठाची सुरुवात झाली ती चौथ्या शतकात गुप्त वंशाच्या कुमारगुप्त या राजापासून.         मात्र त्याआधीही नालंदा अस्तित्वात  असल्याचे उल्लेख सापडतात. सम्राट अशोकाने  (इ.स.पूर्व २०० वर्षे) नालंदाच्या परिसरात बुद्ध विहार बांधले होते. मात्र साèया जगाला अभिमान वाटावा, असे हे विद्यापीठ सन ११९९ मध्ये धर्मांध तुर्की मोहम्मद बख्तियार या आक्रमकाने पेटवून उध्वस्त केले. या विद्यापीठातील अमाप असा गं्रथसाठा तब्बल सहा महिन्यापर्यंत जळत होता.  या ऐतिहासिक विद्यापीठाचा शोध एकोणिसाव्या शतकात १८६१ मध्ये ब्रिटीश व्हॉईसराय कqनगहॅम यांनी लावला. या परिसराचे सलग दहा वर्षे उत्खनन करण्यात आले. त्यात नालंदा हा खजिनाच सापडला. मात्र आता या वैभवशाली विद्यापीठाच्या ठिकाणी जो परिसर दिसतो तो भग्न अवशेष परिसर आहे. त्याकाळच्या भव्यतेच्या आणि संपन्नतेची आजही आठवण करुन देणारा. विसाव्या शतकात नालंदा एज्युकेशन फाउंडेशनने १९८६ मध्ये नालंदा विद्यापीठाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला तत्कालीन केंद्रीय मंत्री व्ही.एन. गाडगीळ आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा उपस्थित होते. त्यानंतर नालंदा विद्यापीठात २००४ पर्यंत शैक्षणिक कार्य सुरु होते. विद्यापीठाकडे सीबीएसईची संलग्नता होती. त्यानंतर जमीनीचा वाद न्यायालयात गेला आणि विद्यापीठातील शैक्षणिक कार्य बंद पडले. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी नालंदा विद्यापीठाची नव्याने उभारणी व्हावी, अशी अपेक्षा काही वर्षांपूर्वी व्यक्त केली होती. सन २००६ च्या पूर्व अशियाई देशांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान मनमोहनqसग यांनी ती बोलून दाखवली. पौर्वात्य देशांनी ती उचलून धरली. qसगापूरचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज यो यांनी त्यासाठी पुढकार घेऊन ती कल्पना वास्तवात आणण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय समिती नेमली. नोबेल पारितोषिक विजेते डॉ.अर्मत्य सेन यांनी समितीचे नेतृत्व करण्याचे मान्य केले. भारत, चीन, जपान या सर्व देशांनी त्याला पाठींबा दिला.  पूर्व अशियाई देशांच्या या शिखर परिषदेमधील अनेक कलमांमध्ये नालंदाच्या उभारणीचा समावेश करण्यात आला. भारतीय संसदेपुढे त्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. मध्यंतरी अर्मत्य सेन यांनी पंतप्रधान मनमोहनqसग यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी या प्रकल्पाला तत्काळ संमती दिली. इतिहासाची आता पुनरावृत्ती होणार आहे. qसगापूरचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज यो यांनी या विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार केला आहे आणि इतर पौर्वात्य देशांनी त्याला दुजोरा दिला आहे. विद्यापीठाच्या उभारणीच्या दृष्टीने कामाला सुुरुवातही झालेली आहे. नव्या नालंदा विद्यापीठासाठी ४५० एकरहून अधिक जागा घेण्यात आली आहे. त्याच्या उभारणीसाठी सुमारे ५००० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी निम्मी रक्कम इमारतींच्या बांधकामासाठी आणि उर्वरित रक्कम विद्यापीठाचे अवशेषांचे आधुनिकीकरण, सोयी-सुविधांनी कार्यक्षम बनविण्यासाठी वापरली जाणार आहे. जपान आणि qसगापूर या देशांनी प्रत्येकी पाचशे कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. विद्यापीठाच्या स्थापनेत सोळा देश सामील होणार आहेत. या विद्यापीठाचा अभ्यासक्रम पदव्युत्तर राहणार असून बौद्ध धम्माचे अध्यायन, तर्कशास्त्र, विविध धर्माचा तुलनात्मक अभ्यास, तत्त्ववाद, उत्खनन, कृषी, आंतरराष्ट्रीय संबंध, व्यापार, भाषा, साहित्य, विज्ञान या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. प्रामुख्याने कृषी विषयावर अधिक भर देण्याची भूमीका राष्ट्रपती मुखर्जी यांची आहे.
या नालंदा विद्यापीठाच्या पुनस्र्थापनेमुळे इतिहासाला उजाळा मिळणार आहे. ज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात देश पुन्हा उभारी घेईल, शिवाय भारताचे पौर्वात्य देशांसोबतचे संबंध दृढ होण्यासाठी हे विद्यापीठ दुवा ठरेल. यात शंका नाही.
                                                                                 -शिवाजी कांबळे
                                                                                   ९०११३०८५८०                                                                                                                                                                                                                                    

Wednesday, June 5, 2013

लातूरचा ‘ हिरा'


परवा राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लातूर मुक्कामी एका कार्यक्रमात म्हटले होते की, लातूर हे मराठवाड्यातील ऑक्सफर्ड आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी शिक्षणाचा लातूर पॅटर्न पुढे आणला. पण आता स्पर्धा परीक्षेतही लातूर पॅटर्न निर्माण होत आहे. लातूर जिल्ह्यातील सहा मुलांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. या परीक्षेत उत्तीर्ण होणं साधी बाब नाही. अशा या देशातील सर्वोच्च परीक्षेत देशात पंधरावा येणारा कौस्तुभ चंद्रप्रकाश दिवेगावकर त्यापैकीच एक यशोदिप.
रेणापूर तालुक्यातील दिवेगाव हे त्याचे गाव. वडिल शेती करुन होमिओपॅथी प्रॅक्टीस रतात. तर आई गृहिणी आहे. अशा मध्यमवर्गीय कुटुंबातील कौस्तुभ हा त्यांचा एकुलता एक मुलगा. कौस्तुभचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण लातूरच्या केशवराज विद्यालयात झाले. तर बारावीपर्यंतचे शिक्षण लातूरच्याच मिqलद महाविद्यालयात घेतले. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्याने कला शाखेत  मराठी विषय घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं नंतर त्याने औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडर मराठवाडा विद्यापीठातून एम.ए. चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.कौस्तुभने २०१२ मध्ये झालेल्या युपीएससीच्या अंतीम परीक्षेत देशात १५ वी रँक मिळवली. त्याने अतुलनीय असं यश मिळवलं. कौस्तुभ आपल्या या यशाबद्दल सांगताना म्हणतो की, फुल-शाहू -आंबेडरी विचारांची प्रेरणा, आई-वडिलांचे आर्शिवाद आणि गुरुजणांचं मार्गदर्शन यामुळंच मी हे यश प्राप्त करु शकलो. युपीएससीसाठी त्याने मराठी, इतिहास आणि समाजशास्त्र हे वैकल्पिक विषय घेतले होते. या विषयांचा अभ्यास करिअरसाठी आणि युपीएससीसाठी महत्त्वाचा वाटला. जाणीवपूर्व आणि डोळसपणे आपण समाजातील प्रश्नांकडं पाहणं आणि संवेदनशील असणं, हे युपीएससी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पोषक असल्याचं कौस्तुभने सांगितलं. आपणास युपीएससीच्या मुलाखतीत सद्धा साहित्य, शिक्षण आणि समाज याचा संबंध, यावरच अधिक प्रश्न विचारण्यात आले. अभ्यासाबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला, मी स्वत:चे नोट्स काढले, गाईडचा वापर केला नाही. अभ्यास रोज किती तास करायचा, असं काही निश्चिीत नव्हतं, पण किमान चार-पाच तास अभ्यास करत होतो. एनसीआरटी आणि महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकांचा उपयोग केला. फ्रंटलाइन, हिंदू सारखी वृतपत्रं आणि मुलाखतीच्या दरम्यान महाराष्ट्र शासनाचे लोकराज्याच्या वाचनाचा खूप फायदा झाला. परीक्षेचा काळ हा खडतर काळ असतो, पण या काळात नाउमेद न होता तयारी केली पाहिजे. कारण ही परीक्षा म्हणजे एक प्रकारे मानसिक कणखरतेचीच असते. अशा स्पर्धा परीक्षेकडे येणाèया विद्याथ्र्यांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता पुढे आले पाहिजे. मराठीतही अभ्यास साहित्य भरपूर उपलब्ध आहे. त्याचा फायदा स्पर्धा परीक्षेत उतरु इच्छिणाèया विद्याथ्र्यांनी घ्यायला हवा. असा संदेश त्याने आजच्या तरुणाईला दिला आहे.
                                                                                   
                                                                                  -शिवाजी कांबळे
                                                                                    ९०११३०८५८०

Saturday, June 1, 2013

राष्ट्रपती प्रणवदा मराठवाडा भेटीवर


..........................................
देशाचे राष्ट्रपती श्रीमान प्रणव मुखर्जी हे आज (शुक्रवार)लातूरात येत आहेत. शहरातील नामांकित दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला ते शनिवारी हजर राहणार असून राष्ट्रपती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मराठवाड्यात येत आहेत, त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तुत्वाची थोडक्यात ओळख करुन देणारा हा मागोवा...
.......................................................
लातूरचे भाग्यविधाते, लोकनेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील लातूरला आल्या होत्या. त्यावेळी विलासराव देशमुख यांनी त्यांचे भव्य स्वागत केले होते. आता विलासराव साहेबांशिवायच्या लातूरात देशाचे विद्यमान राष्ट्रपती श्रीमान प्रणव मुखर्जी येत आहेत. साहेबांच्या गावात श्रीमान मुखर्जी यांच्या स्वागताचीही जंगी तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या या दौèयाला लातूरकरांची भावनिक किनारही जुळली गेलेली आहे. प्रणव मुखर्जी उर्र्फ प्रणवदा गतवर्षी जुलै महिन्यात देशाचे तेरावे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या फाशीच्या सर्व दया याचिका निकाली काढून देशाच्या या सर्वोच्च पदावरही त्यांनी आपल्या निर्णय क्षमतेची झलक दाखवून दिली.  पक्षीय राजकारणातही ते तेवढेच सक्रिय राहीले. त्यांनी आपल्या पन्नास वर्षांच्या राजकीय जीवनात देशपातळीवरील महत्त्वाच्या जबाबदाèया  यशस्वीपणे पेलल्या आहेत.
पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील मिराती या लहानशा गावात एका ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या श्रीमान प्रणवदांना लहानपणापासूनच समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू त्यांचे पिता qककर मुखर्जी यांच्याकडून मिळाले होते. त्यांचे पिता qककर मुखर्जी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक झुंजार स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी ब्रिटिश राजवटीत बंड केल्याने त्यांनी दहा वर्षे तुरुंगवासही भोगला होता. शिवाय ते १९२० पासून कॉंग्रेस पक्षात सक्रिय झाल्यानंतर पश्चिम बंगाल विधान परिषदेचे तब्बल बारा वर्षे सदस्य होते. शिवाय वीरभूम जिल्ह्याचे कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्षही होते. त्यामुळे श्रीमान प्रणवदांची जडणघडण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपसुकच होत गेली. सूरी विद्यासागर महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. कोलकाता विद्यापीठात त्यांनी इतिहास आणि राज्यशास्त्र पदव्युत्तर शिक्षणासोबतच कायद्याची पदवी प्राप्त केली.
 वकिल, प्राध्यापक, पत्रकार
ते वकिल आणि प्राध्यापक म्हणून त्यांनी काहीकाळ सेवा केली. मातृभूमी की पुकार या वृत्तपत्रात त्यांनी पत्रकारिताही केलेली आहे. एवढेच नव्हे तर त्यांना साहित्यामध्येही रुची होती. बंगीय साहित्य परिषदचे विश्वस्त आणि अखिल भारतीय बंग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य केलेले आहे. श्रीमान प्रणवदांनी १९८४ मध्ये बियॉंड सव्र्हायवल :  एमर्जिंग डायमेंशन ऑफ इंडियन इकॉनॉमी, १९८७ मध्ये ऑफ द टेक, १९९२ मध्ये सागा ऑफ स्ट्रगल अ‍ँड सॅक्रिफाइस आणि १९९२ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरील चॅलेंजेस बिफोर द नेशन या ग्रंथांचे लेखन केले. साहित्यिक आणि लेखक म्हणूनही त्यांनी आपला ठसा या क्षेत्रात त्यांनी उमटवलेला आहे.
राजकीय वाटचाल
श्रीमान प्रणदांना काँग्रेस पक्षांतर्गत आणि सामाजिक  धोरणांमध्येही त्यांना सन्मान मिळाला आहे. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात पन्नास वर्षांपूर्वी १९६९ मध्ये काँग्रेस पक्षाचे राज्यसभा सदस्य म्हणून झाली. ते १९७३ पर्यत पाचही वेळेस राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते औद्योगिक विकास खात्याचे केंद्रीय उपमंत्री म्हणून मंत्रिमंडळात सामील झाले. १९८२-८४ दरम्यान कॅबिनेट पदावर होते आणि १९८४ मध्ये ते देशाचे अर्थमंत्री बनले. याचवर्षी जगातील सर्वात सक्षम आणि चांगल्या पाच अर्थमंत्र्यांमध्ये त्यांची गणना युरोमनी पत्रिकेने केलेल्या सव्र्हेक्षणात करण्यात आली. ते याच काळात पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते. प्रणवदा अर्थमंत्री असताना डॉ. मनमोहनqसग हे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मात्र ते पक्षांतर्गत कलहामुळे मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकले नाही. काही काळासाठी त्यांना काँग्रे पक्षातून निष्काषित करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. मात्र १९८९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत समझोता झाल्याने त्यांनी आपल्या समाजवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले. त्यामुळे प्रणवदांचे पुन्हा राजकीय पुनर्वसन झाले. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरqसह राव यांच्या कार्यकाळात  नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष बनले त्यानंतर ते पहिल्यांदा परराष्ट्रमंत्री झाले. १९९७ मध्ये त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा बहुमान मिळाला. सन २००४ मध्ये जेव्हा काँग्रेसे संयुक्त पुरोगामी आघाडी निर्माण करुन सर्व समविचारी घटक पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवले. तेव्हा राज्यसभा सदस्य मनमोहनqसग हे पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून प्रणवदा पहिल्यांदा लोकसभा निवडणुक qजकले आणि त्यांना सभागृह नेता बनविण्यात आले. त्यांना संरक्षण, अर्थ, परराष्ट्र विषयक मंत्रालय, राजस्व, परिवहन, दूरसंचार, वाणिज्य आणि उद्योगासह विविध महत्त्वपूर्ण मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांना मान मिळालेला आहे. अत्यंत कार्यकुशलतेने त्यांनी या मंत्रालयांमध्ये त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली. काँग्रेस संसदीय समितीचेही त्यांनी नेतृत्व केलेले आहे. काँग्रेस मंत्रिमंडळाच्या कामकाजात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
आंतरराष्ट्रीय पदांवर कार्य
प्रणवदांनी विविध आंतरराष्ट्रीय संघटनांमध्येही त्यांनी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. ते बोर्ड ऑफ गव्हर्नसचे सदस्य होते. शिवाय आंतरराष्ट्रीय नाणे निधी, वल्र्ड बँक, एशियन विकास बँक, अफ्रिकन विकास बँकेचे सदस्य म्हणून त्यांनी कामगिरी केलेली आहे.२४ आंतरराष्ट्रीय नाणे निधी मंत्रिमंडळ (आयएमएफ आणि वल्र्ड बँकेशी संबंधित) समूहाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे. मे १९९५ आणि नोव्हेंबर १९८५ मध्ये ते सार्क परिषदेचे अध्यक्ष होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा त्यांना गाढा अभ्यास आहे.
पक्ष निष्ठावंत
 काँग्रेसमध्ये त्यांची प्रतिमा पक्ष निष्ठावंत वरिष्ठ नेत्यांची आहे. पक्षात त्यांना मोठे मानाचे स्थान आहे. मीडियातून त्यांना दांडगी स्मरणशक्ती असलेला आणि आपले आस्तित्व कायम ठेवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणारा राजकीय नेता म्हूणन संबोधले जाते. जेव्हा सोनिया गांधी यांना राजकारणात सक्रिय सहभागी होण्याची इच्छा नव्हती तेव्हा ज्या वरिष्ठांनी सोनिया गांधी यांना राजकारणात येण्यास राजी केले त्यापैकी  प्रणवदा हे एक आहेत. प्रणवदांची अमोघ निष्ठा आणि पात्रतेने त्यांना विद्यमान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहनसिेंग यांच्या निकट आणले. त्यामुळेच ते २००४ मध्ये देशाचे संरक्षण मंत्री बनले. २००५ मध्ये पेटंट सुधारणा विधेयकावरील समझोत्या दरम्यान त्यांच्या प्रतिभेचे दर्शन झाले. काँग्रेस हे महत्त्वपूर्ण विधेयक पारित करण्यासाठी कटिबद्ध होते. मात्र संपुआमधील घटक पक्ष असलेल्या डाव्या पक्षांनी या विधेयकाला विरोध केला. तेव्हा संरक्षण मंत्री असताना प्रणवदांनी विरोधकांशी चर्चा करुन यावर तोडगा काढला आणि अखेर २३ मार्च २००५ ला हे विधेयक मंजुर करण्यात आले. कोणत्याही अडचणीतून पक्षाला बाहेर काढायचे, संकटावर मात करायचे कसब प्रणवदांकडे आहे. त्यामुळे त्यांचे काँग्रेस पक्षातील महत्त्व आणखीनच वाढले.
 निष्कलंक व्यक्तिमत्त्व
 श्रीमान प्रणवदांच्या पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांची प्रतिमा स्वच्छ, निष्कलंक अशी राहीली. १९९८ मध्ये ते परराष्ट्र मंत्री असताना रीडिफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत कॉंग्रेसवर होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर श्रीमान प्रणवदा म्हणाले होते की, भ्रष्टाचार एक मुद्दा आहे. काँग्रेसच्या जाहिरनाम्यात आम्ही भ्रष्टाचार निपटून काढण्याचे आश्वान दिले आहे. मात्र मी हे सांगताना माफ करा की, हे घोटाळे केवळ काँग्रेस सरकारपर्यंतच मर्यादित नाहीत. खूप घोटाळे आहेत, विविध राजकीय पक्षांचे अनेक नेत्यांचा त्यात सहभाग आहे. त्यामुळे हे म्हणणे सहज आहे की, काँग्रेस सरकार सुद्धा या घोटाळ्यांमध्ये सहभागी होती. घोटाळ्यांच्या शुक्लकाष्ठापासून प्रणवदा मात्र कोसो दूरच राहीले. राजकारणात चारित्र्यवान राहण्याचा आणि राजकारण कसे करु नये आणि कसे करावे याचा एक आदर्श पायंडा पाडला. राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या उमेदवारीला सवपक्षीयांनी पाठींबा दिला. हेच त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचे यश आहे.
     देशाचे संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून देशाची मान उंचावणारे मुत्सदीपणाने राजकारण करण्याचे प्रश्न असोत, प्रणवदांनी आपला ठसा भारतीय राजकारणावर उमटवून ठेवला आहे. सध्या देशाचे तेरावे राष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळून आपल्या राजकीय जीवनातील यशोशिखर प्रणवदांनी गाठले आहे.

                                                                                         - शिवाजी कांबळे
                                                                                             ९०११३०८५८०
                                                                                          pub.dt. 31 may 2013

Translate