Thursday, January 23, 2014

शिक्षक दाम्पत्याचे क्रौर्य

उत्तर प्रदेशात पाच वर्षांपूर्वी राजेश आणि नूपुर तलवार या दाम्पत्याने आपली शाळकरी मुलगी आरुषीची हत्या केल्याच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती. दरम्यान काही महिन्यांपूर्वी हरियाणामध्येही जातीबाहेर विवाह करणाèया तरुण जोडप्याला कुटुंबियांनीच  ठार मारून टाकले. तर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी  आशा qशदे या तरुणीचा प्रतिष्ठेपायी जन्मदात्यांनीच खून केला. आशा शिंदेच्या या घटनेने साèया पुरोगामी महाराष्ट्राला हादरवून सोडले. ही घटना विसरत नाही तोच तसाच धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघड झाला. आपल्या प्रतिष्ठेसाठी शिक्षक असलेल्या बुद्धिजीवी आणि सुसंस्कारित समजल्या जाणाèया शिक्षक दाम्पत्याने आपल्या पोटच्या मुलीची  अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. जाती-धर्माबाहेरच्या  मुलाशी प्रेम करून लग्न करण्याची इच्छा असलेल्या  मयुरी ऊर्फ सोनी  जायभाये  या सतरावर्षीय मुलीला घराण्याच्या इभ्रतीसाठी ठार करून शिक्षक दाम्पत्याने  अमानुषतेचे क्रौर्य दाखविले. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणाने मात्र महाराष्ट्राची वैचारिकता आणि मानसिकता पुरती खरवडून निघाली आहे. राज्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीपासून ‘लेक वाचवाङ्क अभियान सर्वत्र सुरू झाले. याआधीपासून  स्त्रीभू्रण हत्याविरोधी चळवळ सुरू झाली. पर्यायाने गर्भqलगनिदानाविरोधात वातावरणनिर्मिती झाली. नांदेड जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात आंतरधर्मीय-जातीय मुलांसोबत मुलींनी पळून जाऊन विवाह करण्याचे प्रमाण वाढले म्हणून एका संघटनेने ‘बहना भाग मत जानाङ्क हे अभियान जोमाने चालविले. युवती मेळावे घेऊन प्रबोधन करण्यात आले. त्यातून काय साध्य झाले हे संबंधित संघटनेलाच माहीत; पण ‘भाग मत जाना वरना खून करूंगाङ्क, जणू अशीच स्थिती निर्माण झाली काय, असे मयुरीच्या खून प्रकरणावरून वाटते. ग्रामीण भागात जन्माला येऊन सगळ्या प्रतिकूलतेवर मात करीत स्व-विकासाची स्वप्ने पाहणाèया, उज्ज्वल भविष्याची आशा बाळगणाèया लाखो मुलींपैकी मयुरी ऊर्फ सोनी माधव जायभाये ही एक बारावीत शिकणारी तरुणी. कंधार तालुक्यातील बोरी या लहानशा खेड्यातील रहिवासी असलेले तिचे आई-वडील माधव आणि छाया हे दोघेही पेशाने शिक्षक. ते नांदेडच्या चक्रधरनगरात राहतात. त्यांची मुलगी मयुरी हिचे शिक्षण घेत असताना एका आंतरधर्मीय युवकाशी प्रेमसंबंध जुळले; पण कट्टर जाती-धर्माच्या या समाजव्यवस्थेतील शिक्षक असलेल्या मयुरीच्या माता-पित्यांना त्यांचे हे प्रेमसंबंध मानवले नाहीत. त्यांच्यातील प्रतिष्ठेचा दानव जागृत झाला आणि १६ ऑक्टोबर २०१३ च्या मध्यरात्री माधव आणि छाया जायभाये यांनी  आपल्या पोटच्या मुलीचा खून केला. तिच्या पित्याने मयुरीचे हातपाय पकडून धरले आणि मातेने मयुरीच्या तोंडावर उशी ठेवून  तिचा प्राण जाईपर्यंत दाबून धरले. एवढेच नाही तर रातोरात या दाम्पत्याने मयुरीचा मृतदेह आपल्या मूळगावी बोरी येथे नेऊन अन्त्यसंस्कारही उरकून टाकला आणि आपली मुलगी तापाच्या आजाराने मयत झाल्याचा बनाव केला. तब्बल अडीच महिन्यांनंतर मयुरीच्या खुनाला वाचा फुटली. या घटनेतून मुलीचा खून करणाèया दाम्पत्याची विकृत मनोवृत्तीच दिसून येते. एवढेच नाही तर त्यांनी शिक्षकी पेशालाही काळिमा फासला आहे. जाती, धर्मातून आलेल्या चालीरीती, जात आणि समाजाच्या चौकटी, अशी किती तरी बंधने मुलींवर असतात. पण महाविद्यालयात शिकताना जाणीवा व्यापक होतात, जातीबाहेरच्या मित्रांबरोबर संसाराची स्वप्ने रंगविली जातात. पण मुली वा महिलांनी पायरी सांभाळून दिलेले स्वातंत्र्य उपभोगावे, असे ठामपणे मानणाèया माधव जायभाये याच्या संकुचित जगाने मयुरीचे सर्व हक्क नाकारले.  स्त्रीस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, संविधानाने, घटनेने दिलेले अधिकार, जातीअंताच्या चळवळी यातील काहीच जायभाये दाम्पत्याला मयुरीचा खून करण्यापासून रोखू शकले नाही. पण मयुरीसारख्या किती तरी लेकीबाळी आहेत, एक आश्वस्त जग निर्मिण्याची खरी गरज आहे.

                                                                                                        पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

No comments:

Post a Comment

Translate