Sunday, December 30, 2012

क्रांतीकारी शुभेच्छा!


मित्रानो,
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या क्रांतीकारी शुभेच्छा!
पण या शुभेच्छा देताना वाईटही तेवढेच वाटते आहे.
दिल्लीतील सामूहिक बलात्कारातील वेदनेने महिलांच्या सुरक्षेसाठी बलिदान दिले आहे. ती शहिद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या बहुतांश तरुणाईने नव वर्षाचा जल्लोष साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तो रास्तच आहे. देशात यापूर्वीही बलात्काराच्या रोज अनेक घटना घडत होत्याच, पण त्या अत्याचाराला वाचा फुटत नव्हती, वाचा फुटली तर पोलिस प्रशासन आणि सरकार दरबारी तिला न्याय मिळत नव्हता. आपल्या देशाचे कायदे कणखर आहेत, पण कायद्याची अंमलबजावणी करणारेच नालायक, जातीवादी, अत्याचारी असल्याने असंख्य सावित्रीच्या लेकींना न्याय मिळू शकला नाही. आता दिल्लीच्या पीडित मुलीच्या भयावह प्रसंगाने देशालाच नव्हे तर जगाला हादरे दिले आहेत. परंपरेने नटलेल्या, सारे भारतीय भाऊ-बहिण आहोत म्हणून रोज गजर करणाèया देशाची जगभर छी थू होत आहे. काही वर्षांपूर्वी खैरलांजी प्रकरणातील पीडितांना न्याय मिळाला असता तर आज दिल्लीत दामिनीवर बलात्कार झाला नसता. तालिबान्यांशी दोन हात करणाèया पाकिस्तानातील मलालानेही भारत सरकारला रेपिस्ट संबोधून आरोपीच्या पिंजèयात उभे केले आहे. अण्णांच्या आंदोलनानंतर आता पीडित मुलीच्या मृत्यूने पुन्हा एकदा देशात क्रांतीची मशाल पेटली आहे. इजिप्त आणि लिबियाप्रमाणे आपल्या देशातही क्रांतीची गरज आहे. स्वत: नपुंसक असलेले सत्ताधारी बलात्काèयांना काय नपुंसक बनविणार? आता एकच मार्ग आहे, तो म्हणजे क्रांतीचा...बदलाचा....
......................शिवाजी कांबळे


No comments:

Post a Comment

Translate