Thursday, December 27, 2012

अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई'


अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई 
२४ डिसेंबर हा सानेगुरुजी अर्थात पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त सानेगुरुजींची मुले म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाणारी तथाकथित मंडळी त्यांच्या जीवनकार्यावर, त्यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत असतात. पण सानेगुरुजींचा अशाही एक पैलू आहे की, ते आज पुरोगामी महाराष्ट्राला विचार करावयास लावणारा आहे. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, असे आपल्या प्रार्थनेतून बालमनावर संस्कार करणा-या सानेगुरुजींच्या ‘श्यामची आई पुस्तकातच तेही अस्पृश्यता कसे पाळत होते, हे दिसून येते. त्यांनी लिहिलेले ‘श्यामची आईङ्क हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील एक सोनेरी पान, असे मानले जाते. त्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी १९५३ साली ‘श्यामची आईङ्कनावाने चित्रपट बनवला. १९५४ साली या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. लहान मुलांवर संस्कार करणारे पुस्तक म्हणून गेली पाऊणशे वर्षे उदो उदो केला जात आहे. सानेगुरुजींकडे संपूर्ण महाराष्ट्र हा एक सत्पुरुष म्हणूनच पाहतो आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सानेगुरुजींनी आमरण उपोषण केले होते. तेव्हा एका पांडुरंगाने दुस-या पांडुरंगाला जोखडातून मुक्त केले, अशी प्रतिक्रिया उभ्या महाराष्ट्रात उमटली. मात्र सानेगुरुजी स्वत: जातिभेदाच्या, ब्राह्मण्याच्या जोखडातून सुटू शकले नाही. हे त्यांच्याच ‘श्यामची आईङ्क या कादंबरीतून स्पष्ट होते. या पुस्तकातील श्याम हा वसतिगृहातील आपल्या मित्रांना आपल्या आईची कहाणी सांगत असतो. एका रात्री तो आपली आई जातीयवादाला कशी थारा देत नव्हती, याबद्दल सांगत असतो. ते प्रकरण म्हणजे देवाला सारी प्रिय, ही कथा सांगताना एका लाकडाची मोळी विकणा-या अस्पृश्य
समाजातील वयोवृद्ध महिलेला मोळी उचलून देण्याची मदत करून मोठे समाजकार्य केल्याचा आव आणला जातो; परंतु या पुस्तकाच्या पान क्रं. १११,११२ आणि ११५ वर ‘श्यामची आईङ्क कशी अस्पृश्यता पाळणारी होती, हे स्पष्टच होते. रस्त्यात असह्य ती अस्पृश्य महिला असते. तिला तिच्या जातीमुळे मोळीसुद्धा कोणी उचलून देत नाही. ‘श्यामची आईङ्क पाहते, तीही तिला मदत करत नाही. पण श्यामच्या आईला सरपणाची खरी गरज असते. त्यातून ती श्यामला सांगते की, बाळ, त्या महारिणीला मोळी उचलून दे. तो म्हणतो लोक काय म्हणतील, तेव्हा आई म्हणते घरी येऊन आंघोळ कर. श्याम मोळी
उचलून देतो. श्याम घरी आल्यानंतर त्याची आई त्याला घरात न घेता बाहेरच दुरूनच त्याच्या अंगावर पाणी
ओतते. स्नानात शुद्धी आहे, हे त्याला आईने सांगितलेले नसते, पण महाराला शिवल्यानंतर ब्राह्मण अशुद्ध
होतो, असे त्याला आधीच माहीत असते. या प्रसंगामध्ये आई देवाला सारीच प्रिय आहेत, यावर प्रवचन देते, मात्र अस्पृश्यता हे पाप आहे, असे ती कधीच सांगत नाही. दलितांना स्पर्श केल्यानंतर घरी जाऊन आंघोळ करावी, हा संस्कार आजच्या मुलांनी घ्यावा का?
                   --- शिवाजी कांबळे

No comments:

Post a Comment

Translate